एक्स्प्लोर
पंजाब नॅशनल बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले
पंजाब नॅशनल बँकेने विविध कालावधीतील मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याजदारात वाढ केली आहे. बँकेने 10 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात 1.25 टक्क्यापर्यंतची वाढ केली आहे.
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने विविध कालावधीतील मुदत ठेवीवरील (Fixed Deposit) व्याजदारात वाढ केली आहे. बँकेने 10 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात 1.25 टक्क्यापर्यंतची वाढ केली आहे. हे नवे व्याजदर 1 जानेवारी 2018 पासून लागू असणार आहेत.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सात दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या एक कोटी रुपयापर्यंतच्या ठेवीवर आतापर्यंत 4 टक्के व्याज मिळत होते. पण आता याच कालावधीसाठी खातेदाराला 5.25 टक्के व्याज मिळेल. तर 30 ते 45 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर 4.50 वरुन 5.25 टक्के करण्यात आले आहेत. 46 ते 90 दिवसांच्या ठेवीवर आत्तापर्यंत 5.50 टक्के व्याज मिळत होते. पण आता 6.25 टक्के व्याज मिळेल. तर 91 ते 179 दिवसांच्या ठेवीवर नव्या व्याजदरानुसार 6 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल.
बँकेने एक कोटी ते 10 कोटी रुपयापर्यंतच्या 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवर 4 टक्क्यांऐवजी 4.8 टक्क्यांनी व्याज देण्याचे निश्चित केले आहे. अशाच प्रकारे 46 ते 179 दिवसांच्या ठेवीवर 4 टक्क्यांऐवजी 4.9 टक्के, 180 दिवसांपासून ते 344 दिवसांच्या ठेवीवर 4.25 ऐवजी पाच टक्के व्याज मिळेल.
तर एक वर्षाच्या मुदत ठेवीवर व्याजदर 5 टक्क्यांवरुन 5.7 टक्के करण्यात आला आहे. तर एक ते तीन वर्षापर्यंतच्या ठेवीवरील व्याजदर 5 टक्क्यांवरुन 5.5 टक्के निश्चित करण्यात आलं आहे. तर तीन ते दहा वर्षांच्या ठेवीवर पाच टक्क्यांऐवजी आता 5.25 टक्के व्याज मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement