एक्स्प्लोर
Advertisement
Pulwama Encounter : हिजबुलच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा, अनंतनागमध्ये चकमक सुरुच
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरुच आहेत. आज सकाळी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार करण्यात लष्कराला यश मिळाले होते.
जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरुच आहेत. आज सकाळी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार करण्यात लष्कराला यश मिळाले होते. या तीनही दहशतवाद्यांची ओळख पटली असून हे तिघेही जण हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. ठार केलेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकजण हा हिजबुलचा कमांडर होता.
शोकात डार, इरफान वार आणि मुजफ्फर शेख अशी तिनही दहशतवाद्यांची नावे आहेत. या तिघांविरोधात अनेक गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. ठार केलेल्या तिघांपैकी शौकत अहमद डार आणि त्याचे साथीदार पुलवामा भागात गेल्या चार वर्षांपासून सक्रिय होते. भारतीय सेनेचा जवान औरंगजेबच्या हत्येमागे शौकत डार याचा हात असल्याचे बोलले जात आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार पुलवामात काल रात्रीपासून सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्य़े चकमक सुरु होती. या चकमकीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
अनंतनागमधील देहरुना गावात चकमक सुरुच
जम्मू- काश्मीरच्या अनंतनागमधील देहरुना गावात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. भारतीय लष्कराने अतिरेक्यांना चहूबाजूंनी घेरण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे. तसेच भारतीय लष्कराकडून परिसरात शोधमोहीमसुद्धा राबवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement