एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
किती आहे पंतप्रधानांची संपत्ती?
मुंबई : पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही मंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आपल्या कॅबिनेटमधील मंत्र्यांच्या संपत्तीचा तपशील देण्यास सुरुवात केली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मंत्र्यांची संपत्ती वेबसाईटवर टाकण्यास सुरुवात झाली आहे.
या तपशीलानुसार केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची संपत्ती गेल्या 25 वर्षांमध्ये 17 कोटीच राहिली आहे. तसंच त्यांनी या काळात आपल्या घरातील टीव्ही, फ्रीज, आणि मोबाईलही बदललेला नाही.
किती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती
89 हजार 700 रुपये रोख रक्कम
बँक खात्यात 2 लाख 9 हजार 296 रुपये
बँकेत 51 लाख 27 हजार 428 रुपयांची ठेव
एल अँड टीचा 20 हजारांचा बॉन्ड
नॅशनल सेव्हिंग्ज स्कीममध्ये 3 लाख 28 हजार 106 रुपये
एलआयसीची 1 लाख 99 हजार 31 रुपयांची पॉलिसी
1 लाख 27 हजार 645 रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या
पुस्तकांच्या मानधनासाठी मिळालेले 12 लाख 35 हजार 790 रुपये
पंतप्रधानांकडे कोणतीही जमीन किंवा कार नाही, त्याचप्रमाणे त्यांच्यावर कर्जही नाही.
हे सर्व मिळवून पंतप्रधानांची संपत्ती 73 लाख 36 हजार 996 रुपये आहे.
किती आहे अन्य कॅबिनेट मंत्र्यांची संपत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांना आपली संपत्ती जाहीर करण्यास सांगितलं होतं. ही संपत्ती पंतप्रधानांच्या वेबसाईटवर अपडेट केली जाते.
केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी 1994 नंतर फ्रीज आणि 1993 नंतर टीव्ही खरेदी केला नाही. आजही ते 3500 रुपयांचा नोकिया मोबाईल वापरतात. इतकं असूनही त्यांची संपत्ती 17 कोटींच्या घरात आहे.
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची संपत्ती 52 लाख इतकी असून त्यांच्याकडे 50 हजारांची रोख रक्कम आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांची संपत्ती 53 लाख आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती 1 कोटी 60 लाख आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याकडे 2.5 कोटी संपत्ती आहे.
केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांची 5 कोटी 20 लाखांची संपत्ती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement