एक्स्प्लोर

एका रुपयाचंही नुकसान झालं नाही! चीनमधून मागवलेल्या टेस्टिंग किटवर ICMR चा खुलासा

चीनमधून जे 5 लाख अँटीबॉडी रॅपिड टेस्ट किट भारतात आले. ते आयात करणाऱ्या कंपनीनं तर कहरचं केलाय. या संकटाचा फायदा घेत त्यांनी 245 रुपयांचं किट भारतात चक्क सहाशे रुपयांना विकलं आहे.

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात लोकांसाठी ज्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. त्यांच्या व्यवहारातही कंपन्या नफेखोरी करत असल्याचा  प्रकार समोर आला आहे. चीनमधून हव्या असलेल्या रॅपिड टेस्ट किट ज्या कंपनीकडून मागवल्या गेल्या त्यांनी या व्यवहारात अव्वाच्या सव्वा नफा लाटला आहे. शेवटी दिल्ली हायकोर्टानं या प्रकरणी कंपनीला फटकारून या कंपनीचे कान उपटले आहेत. मूल्यमापन समितीकडे चार बोली आल्या होत्या. त्यामध्ये 1204, 1200, 844 आणि 600 रूपये अशा बोली लावण्यात आल्या होत्या. त्यानुसार 600 रुपये या किंमतीला L-1 मानण्यात आले. दरम्यान ICMRने ही किट्स चीनमधील वोन्डफो कंपनीतून CGI मार्फत थेट मिळविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, थेट खरेदीसाठी सांगण्यात आलेल्या किंमतीत पुढील अडचणी होत्या. फ्री ऑन बोर्ड  फ्री ऑन बोर्ड (FOB) पद्धतीने ही किंमत सांगितलेली होती. म्हणजेच ठराविक पद्धतीने वाहतूक केल्यास वाहतूक खर्च न लागता विक्री किंमतीतच किट्स मिळणार होती. मात्र, वाहतुकीतील अडचणींबाबत यात कोणतीही वचनबद्धता स्वीकारण्यात आलेली नव्हती. कोणत्याही हमी शिवाय मात्र 100 टक्के थेट आगाऊ रक्कम मिळण्याच्या अटीवर ही किंमत सांगण्यात आलेली होती. वेळेबाबत कोणत्याही वचन बध्दतांचा उल्लेख नव्हता. अमेरिकी डॉलरमध्ये दर सांगण्यात आले होते. मात्र त्यात त्याच्या मूल्यातील चढ-उताराबद्दलचे कलम नव्हते. त्यामुळे वोन्डफोच्या भारतासाठीच्या वितरकाशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला गेला. त्या वितरकाने FOB साठी आगाऊ रकमेच्या कलमाशिवाय सर्वसमावेशक अशी किंमत सांगितली. ही किट्स खरेदी करण्यासाठी एका भारतीय संस्थेकडून झालेला हा पहिलाच प्रयत्न होता, व केवळ लिलावात बोलल्या गेलेल्या दरांचाच आधार यासाठी उपलब्ध होता, याची नोंद घेतली गेली पाहिजे. काही प्रमाणात पुरवठा झाल्यानंतर ICMR ने पुन्हा एकदा या किट्सच्या गुणवत्तेच्या चाचण्या प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीत घेतल्या. त्यांच्या कामगिरीचे वैज्ञानिक पद्धतीने मूल्यमापन करून वोन्डफोची आणि दुसरीही ऑर्डर (मागणी) गुणवत्तेच्या कारणावरून रद्द करण्यात आली आहे. येथे आणखी एक मुद्दा अधोरेखित केला जात आहे, की ICMR ने या पुरवठयासंबंधाने कोणतीही रक्कम दिलेली नव्हती. योग्य प्रक्रिया अनुसरून काम केल्याने (100 टक्के आगाऊ रक्कम भरून खरेदी न केल्याने) भारत सरकारचा एकही रुपया वाया गेलेला नाही. कोरोनाचं संकट प्राणघातक आहे. मानवजातीवर कोसळलेल्या या संकटात अनेकजण जुने हिशोब विसरुन माणुसकीच्या नात्यानं मदत करत आहेत. पण काही लोक असे आहेत जे या परिस्थितीतही नफेखोरी करत आहेत. चीनमधून जे 5 लाख अँटीबॉडी रॅपिड टेस्ट किट भारतात आले. ते आयात करणाऱ्या कंपनीनं तर कहरच केलाय. या संकटाचा फायदा घेत त्यांनी 245 रुपयांचं किट भारतात चक्क सहाशे रुपयांना विकलं आहे. म्हणजे एका किटमागे तब्बल 50 ते 60 टक्क्यांचा फायदा काढला आहे. नेमका कसा झाला व्यवहार चीनकडून भारताला 5 लाख रॅपिड टेस्ट किट हवे होते. आयसीएमआरनं त्यासाठी रेअर मेटाबॉलिक्स कंपनीकडे ऑर्डर दिली होती. चीनमधून आयातीचा परवाना असलेल्या मॅट्रिक्स लॅबला 245 रुपयाला एक किट मिळालं. पण त्यांनी रेअर मेटाबॉलिक्सकडे देताना त्याची किंमत 600 रुपये लावली आहे. म्हणजे सव्वा बारा कोटी रुपयांचा माल कंपनीनं 21 कोटी रुपयांना विकला आहे. काहीही न करता जवळपास नऊ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. कुठल्याही व्यवहारात कंपनी आर्थिक नफा बघतेच. पण इथे नफ्याची टक्केवारीही भयानक आहे. जवळपास 50 टक्क्यांपेक्षा अधिक नफा कंपनीनं काढला. दुसरी गोष्ट म्हणजे इतकं करुन जो माल आलाय तो देखील दर्जाहीनचं आहे. कारण या किटचे रिझल्ट चुकीचे येत असल्यानं दोन दिवस हे किट थांबवण्याचे आदेश आयसीएमआरला द्यावे लागले. त्यामुळे केवळ संकटाचा फायदा घेत नफेखोरी करणाऱ्या अशा कंपनीला धडा शिकवण्याची गरज आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या कंपनीच्या कारभारावरुन सडकून टीका केली आहे. आयातीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या या कंपन्यांचं प्रकरण दिल्ली हायकोर्टातही गेलं. कोर्टानं या कंपनीच्या नफेखोरीला चाप लावला आहे. जास्तीत जास्त 245 रुपयांचं हे किट आता 400 रुपयांपेक्षा अधिक किंमतीला विकता येणार नाही. सर्वच कंपन्यांनी त्यांचा व्यवहार सोडून उदारता दाखवावी अशी कुणाचीच अपेक्षा नाही. पण या गंभीर संकटाचं भान ठेवत किमान नफेखोरीची हाव तरी सोडायला हवी. आता अशा कंपन्यांवर सरकार काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असेल. संबंधित बातम्या :

Corona Test | चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किट्सबाबत तक्रारी, ICMR कडून वापर थांबवण्याच्या सूचना

Coronavirus | कोरोनाच्या संकटकाळातही नफेखोरी करणाऱ्यांवर कारवाई करा : राहुल गांधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget