एक्स्प्लोर

PM Modi On UCC: 'एक घर दोन कायद्यांनी चालवता नाही येणार', समान नागरी कायद्यावर पंतप्रधान मोदी यांचे सूचक वक्तव्य

PM Modi On UCC: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा समान नागरी कायद्यावर भाष्य केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी संविधानात नागरिकांना देण्यात आलेल्या समान अधिकारांचा उल्लेख केला.

PM Modi On UCC: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समान नागरी कायद्यावर भाष्य करत पहिल्यांदाच या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (27 जून) रोजी भोपळमधील (Bhopal) 'मेरा बुथ सबसे मजबूत' या कार्यक्रमाअंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी समान नागरी कायद्यावर (UCC) मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, एक घर दोन कायद्यांनुसार नाही चालू शकणार. तसंच एका देशात दोन वेगवेगळे कायदे असू शकत नाहीत. 

पुढे बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, 'समान नागरी कायद्याच्या मुद्द्यावरुन लोकांना भडकवण्याचे काम सुरु आहे. भारताच्या संविधानात देखील नागरिकांच्या समान अधिकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. व्होट बँकेचे राजकारण केले जात आहे आणि मुस्लिम समाज या राजकारणाचा बळी ठरत आहे. काही लोक देश तोडण्याचा देखील प्रयत्न करत आहेत.' तर यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाला समजवण्याचे आवाहन देखील केले. 

भोपाळमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे. लॉ कमिशनने समान नागरी कायद्यावरुन लोकांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण सुरु केले आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

काय आहे समान नागरी कायदा?

देशातील सर्व नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्यासाठी समान नागरी कायदा करण्याचा विचार सध्या सुरू असल्याची चर्चा आहे. म्हणजेच लग्न, घटस्फोट, मूल दत्तक घेणे, मालमत्तेचे विभाजन यासारख्या बाबींमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नियम करण्यात येणार आहेत. सध्या देशात विविध धर्मांबाबत वेगवेगळे कायदे आहेत, त्यामुळे देशात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान भाजपने निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनांपैकीच हे एक आश्वासन आहे. 

कसा लागू होणार समान नागरी कायदा?

सध्या लॉ कमिशन देशातील नागरिकांकडून समान नागरी कायद्यासंदर्भात सल्ले घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. यानंतर कायदेतज्ञ, राजकारणी,  शिक्षणतज्ञ आणि सर्व धर्माचे प्रमुख यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यांनंतर त्यांचा प्रारंभिक मसुदा तयार करण्यात येणार आहे. मसुदा तयार झाल्यानंतर हा कायदा धार्मिक तत्त्वांवर आधारित कायद्यांना बदलण्यात येणार असून त्या जागी समान नागरी कायदा आणण्यात येणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेली महिला पत्रकार होतेय ट्रोल; हे खपवून घेतलं जाणार नाही... व्हाईट हाऊसची प्रतिक्रिया

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Gig Workers Protest : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; स्विगी-झोमॅटो ते ओला-उबर चालकांचा देशव्यापी लॉगआऊट, शनिवारी पाच तासांसाठी डिलिव्हरी ठप्प
पेट्रोल-डिझेल दरवाढीचा फटका; स्विगी-झोमॅटो ते ओला-उबर चालकांचा देशव्यापी लॉगआऊट, शनिवारी पाच तासांसाठी डिलिव्हरी ठप्प
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
2014 पासून आत्तापर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात नेमकी किती झाली वाढ? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Punjab Kings: श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
पंजाब किंग्जची प्लेऑफची वाट खडतर, सलग पाच पराभवांमुळं चित्र बदललं, प्लेऑफचं समीकरण जाणून घ्या? 
Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात
Embed widget