एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदलण्याच्या हालचाली
नवी दिल्ली : '7 रेसकोर्स रोड' हे पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव प्रसिद्ध आहे. मात्र हे नाव बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. '7 एकात्म मार्ग' असं या निवासस्थानाचं नामकरण करण्याची मागणी झाली आहे.
भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी एनडीएमसी अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे केली आहे. लेखी यांनी दिलेल्या प्रस्तावात पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नामकरण '7 रेसकोर्स रोड' ऐवजी '7 एकात्म मार्ग' करण्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्लीतला संबंधित परिसर एनडीएमसी अंतर्गत येतो आणि मीनाक्षी लेखीही याच्या सदस्या आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जन्मशताब्दी आणि एकात्मतेच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी या रस्त्याचं नामकरण '7 एकात्म मार्ग' करावं असं त्या म्हणतात.
'7 रेसकोर्स रोड' हे सध्या अस्तित्वात असलेलं नाव भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाही. मात्र नाव बदलल्यास प्रत्येक पंतप्रधानाची नाळ समाजातील शेवटच्या व्यक्तीशी जोडली जाईल, अशी आशा लेखी यांनी व्यक्त केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जीभेवर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे ते बुधवारी होणाऱ्या बैठकीला हजर राहणार नाहीत. त्यामुळे मीनाक्षी लेखी यांच्याकडे नगर परिषदेचं अध्यक्षपद असेल. अशा परिस्थितीत पंतप्रधान निवासाचं नवीन नामकरण निश्चित मानलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement