एक्स्प्लोर

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल; एनडीएचं जोरदार शक्तीप्रदर्शन

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएचं जोरदार शक्तीप्रदर्शन 

Presidential Election 2022 : झारखंडच्या माजी राज्यपाल आणि एनडीएच्या (NDA) राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पीएम मोदी (PM Modi) उपस्थित होते. त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह एनडीएचे बडे नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत एनडीएनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. 

राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक आणि समर्थक म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्वाक्षरी केली आहे. तसेच, द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षांकडून समर्थन मागितलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे राष्ट्रपती निवडणुकीसाठी समर्थन मागितलं आहे. 

कोण आहेत द्रोपदी मुर्मू? 

एनडीएचे उमेदवार मुर्मू यांचा जन्म  20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात झाला. द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक नगरसेविका म्हणून केली. नंतर त्या रायरंगपूर राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या उपाध्यक्षा बनल्या. 2013 मध्ये त्या पक्षाच्या एसटी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याच्या पदावर पोहोचल्या. तत्पूर्वी द्रौपदी मुर्मू ओडिशात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्या युती सरकारच्या काळात 2000-2002 पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह 6 ऑगस्ट 2002 ते मे पर्यंत मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री होत्या. 

द्रौपदी मुर्मू या 2000 आणि 2004 मध्ये ओडिशाच्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पुढे 2015 मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. झारखंडच्या राज्यपालपदाची शपथ घेणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत. तसेच राज्यपालपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, निवडून आल्यानंतर द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती असतील. याशिवाय त्या ओडिशातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपतीही असतील. राजकारण आणि समाजसेवेत त्यांनी जवळपास दोन दशके काम केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरेTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Embed widget