एक्स्प्लोर
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग आज राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोग तारखांची घोषणा करणार आहे. देशाचा पुढचा राष्ट्रपती कोण असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे, त्यामुळे या महाइलेक्शनकडे देशाचं लक्ष लागलं आहे.विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या 25 जुलैला संपत आहे. त्यामुळे 25 जुलैपूर्वी निवडणुक आयोगाला राष्ट्रपतीपदाची प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि युपीए दोघांनीही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काही महत्त्वाची नावं राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत होती. यात शरद पवार यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात होतं. मात्र वेळोवेळी राष्ट्रवादीकडून या वृत्ताचा इन्कार करण्यात आला. नुकत्याच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत घेतलेल्या बैठकिला 17 पक्ष हजेरी होते. त्यामुळे राष्ट्रपतीपदासाठी काँटेकी टक्कर होण्याची चिन्ह आहेत.
दरम्यान एनडीएकडून संघाची पार्श्वभूमी असलेला व्यक्ती राष्ट्रपदासाठी उमेदवार असू शकतो असं बोललं जात आहे. तर काँग्रेस महात्मा गांधींचे नातू गोपाळ कृष्ण गांधींना उमेदवारी देऊ शकते. असं झाल्यास संघ विरुद्ध गांधी अशी निवडणूक पाहायला मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement