(Source: Poll of Polls)
Cervical Cancer Vaccine : सीरम इन्स्टिट्यूटकडून सर्वाइकल कॅन्सर विरोधी लस तयार, DCGI समितीने केली शिफारस
Cervical Cancer Vaccine : DCGI च्या समितीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (qHPV) लसीला मान्यता देण्याची शिफारस केली आहे.
Cervical Cancer Vaccine : DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने 9 ते 26 वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine) रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटच्या स्वदेशी विकसित क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (qHPV) लसीची शिफारस केली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) द्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्ध प्रथम स्वदेशी लस क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस लसीवर बुधवारी विषय तज्ञ समितीने चर्चा केली.
सिरम इन्स्टिट्यूटला शिफारस
एका अधिकृत सूत्राने सांगितले की, "कोविड-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने बुधवारी या लसीच्या वापरावर चर्चा केली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग विरोधी QHPV लस निर्मितीसाठी तसेच मार्केटिंग मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे." प्रकाश कुमार सिंग, SII चे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) यांनी QHPV साठी 8 जून रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) यांच्याशी संपर्क साधला. तसेच याच्या मार्केटिंग मंजुरीसाठी अर्ज केला होता.
अर्जात म्हटलंय की...
क्लिनिकल चाचण्यांच्या तीनपैकी दोन टप्पे पूर्ण केल्यानंतर हा अर्ज करण्यात आला आहे. अर्जात सिंग म्हणाले की, QHPV लस CervaVac ने सर्व वयोगटांमध्ये बेसलाइनपेक्षा जवळपास 1,000 पट जास्त अँटीबॉडींचा प्रतिसाद दाखवला आहे. अर्जात प्रकाश कुमार म्हणाले की, दरवर्षी लाखो महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तसेच इतर काही कर्करोगाचे निदान होते आणि मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे. भारतातील गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. ते म्हणाले की, इतर अनेक स्वदेशी जीवरक्षक लसींप्रमाणे, आम्ही भारतातील पहिल्या स्वदेशी जीवरक्षक qHPV लसीसाठी आपला देश स्वावलंबी बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'वोकल फॉर लोकल'चे स्वप्न पूर्ण होईल.
ही लस कधी बाजारात येण्याची अपेक्षा आहे?
याबाबत असे सांगितले जात आहे की, 2022 च्या अखेरीपूर्वी ही लस (सर्व्हायकल कॅन्सर लस) बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. HPV ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध भारतातील पहिली देशी बनावटीची लस असेल. देशात त्याची लवकर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या मदतीने फेज 2/3 क्लिनिकल चाचण्या पूर्ण केल्यानंतर बाजार अधिकृततेसाठी अर्ज केला.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )