(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pranab Mukherjee | देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे.
नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
With a Heavy Heart , this is to inform you that my father Shri #PranabMukherjee has just passed away inspite of the best efforts of Doctors of RR Hospital & prayers ,duas & prarthanas from people throughout India ! I thank all of You ????
— Abhijit Mukherjee (@ABHIJIT_LS) August 31, 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम होता. 5 दशकांच्या त्यांच्या सार्वजनिक जीवनात, अनेक उच्च पदांवर असूनही ते नेहमीच जमिनीशी जोडले गेले. त्यांच्या सभ्य आणि मनमिळावू स्वभावामुळे ते राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते.
पूर्व राष्ट्रपति, श्री प्रणब मुखर्जी के स्वर्गवास के बारे में सुनकर हृदय को आघात पहुंचा। उनका देहावसान एक युग की समाप्ति है। श्री प्रणब मुखर्जी के परिवार, मित्र-जनों और सभी देशवासियों के प्रति मैं गहन शोक-संवेदना व्यक्त करता हूँ।
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करत प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. देशाच्या विकासाच्या मार्गावर त्यांनी छाप सोडली आहे. एक विद्वान, एक राजकारणी त्यांचे समाजातील सर्व घटकांनी कौतुक केले.
India grieves the passing away of Bharat Ratna Shri Pranab Mukherjee. He has left an indelible mark on the development trajectory of our nation. A scholar par excellence, a towering statesman, he was admired across the political spectrum and by all sections of society. pic.twitter.com/gz6rwQbxi6
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2020