एक्स्प्लोर
Advertisement
प्रद्युम्न हत्याकांड : चौकशीसाठी तीनजण सीबीआयच्या ताब्यात
प्रदुम्न हत्याकांडाच्या चौकशीसाठी पोलिसांनी अटक केलेल्या तिघाजणांना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नची 8 सप्टेंबर रोजी हत्या झाली होती.
नवी दिल्ली : प्रदुम्न हत्याकांडाच्या चौकशीसाठी पोलिसांनी अटक केलेल्या तिघाजणांना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे. रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या सात वर्षीय प्रद्युम्नची 8 सप्टेंबर रोजी हत्या झाली होती.
याप्रकरणी सीबीआयने कोर्टाकडे शाळेचा बस कंडक्टर अशोक कुमार, रायन इंटरनॅशनल स्कूलचे क्षेत्रीय प्रमुख फ्रान्सिस थॉमस आणि एचआर प्रमुख जियस थॉमस यांचा ताबा मागितला होता. यानंतर कोर्टाने या तिघांचाही सीबीआयला ताबा दिला.
सीबीआयच्या प्रवक्त्याने याबाबत सांगितलं की, गुरुग्राममधील शाळकरी विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी सीबीआयच्या चौकशीसाठी कोर्टाने तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे.
शुक्रवारी केंद्राच्या सूचनेनुसार गुरुग्राममधील शाळकरी विद्यार्थ्याच्या हत्येचा तपसा सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले होती. या प्रकरणी गुरुग्राममधील भोंडसी पोलीस स्थानकात आयपीसीच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
प्रद्युम्न हत्या : शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर
लैंगिक शोषणानंतर 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरुन हत्या, बस…
प्रद्युम्न हत्या : वडिलांची याचिका, सुप्रीम कोर्टाची हरियाणा सरकार, शाळेला नोटीस
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement