एक्स्प्लोर
Advertisement
EXCLUSIVE : पीएनबी घोटाळा 12 हजार 700 कोटींचा नव्हे, 29 हजार कोटींचा!
मोदी सरकारच्या कार्यकाळात मामा-भाच्यांनी म्हणजे मेहुल चोकसी आणि नीरव मोदी यांनी एलओयूच्या अटींचं पालन केले नाही आणि 20 हजार कोटींचा घोटाळा केला.
नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यात मोठी माहिती उघड झाली आहे. हा घोटाळा 12 हजार 700 कोटींचा नव्हे, तर 29 हजार कोटी रुपयांचा आहे. मनमोहन सिंग सरकार आणि मोदी सरकार अशा दोन्ही सरकारच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला असून, घोटाळ्यासाठी जी पद्धती अवलंबली आहे, त्यातून आणखी मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पीएनबी घोटाळा 29 हजार कोटी रुपयांचा असून, यातील 9 हजार कोटी रुपये मनमोहन सिंग सरकारच्या काळात लुटले गेले, तर 20 हजार कोटी रुपये मोदी सरकारच्या काळात लुटले गेले. या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं एबीपी न्यूज नेटवर्कच्या हाती लागले आहेत.
एबीपी न्यूज नेटवर्कच्या हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार, पीएनबी घोटाळ्यातील काळे कारनामे भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांच्या कार्यकाळात घडले असल्याचे उघड झाले आहे. शिवाय, बँकांसह सरकारची व्यवस्था कशी अपयशी ठरली, तेही यावरुन सिद्ध होते.
पंजाब नॅशनल बँकेच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना समोर आले की, हा घोटाळा 2011 साली सुरु झाला, तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं.
- 2011 साली 50 एलओयूच्या माध्यमातून 750 कोटी रुपये
- 2012 साली 100 एलओयूच्या माध्यमातून 2300 कोटी रुपये
- 2013 साली 250 एलओयूच्या माध्यमातून 4000 कोटी रुपये
- 2014 साली 125 एलओयूच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये
- 2015 साली 350 एलओयूच्या माध्यमातून 4200 कोटी रुपये
- 2016 साली 500 एलओयूच्या माध्यमातून 7000 कोटी रुपये
- 2017 साली 300 एलओयूच्या माध्यमातून 9500 कोटी रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement