एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काळ्या पैशांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाचा नकार
विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे.
नवी दिल्ली : विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) नकार दिला आहे. 16 ऑक्टोबर रोजी केंद्रीय माहिती आयोगाने एक प्रस्ताव दाखल करुन यात पीएमओला 15 दिवसांच्या आत विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता पीएमओने काळ्या पैशांची माहिती देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरटीआय कलम 8(1) नुसार एखादी माहिती जाहीर केल्यामुळे जर तपास करण्यात आणि दोषींविरुद्ध खटला चालविण्यास अडथळा येणार असेल, तर अशी माहिती दिली जाऊ शकत नाही. याचाच आधार घेत पीएमओने ही माहिती देण्यास नकार दिला आहे.
भारतीय वन सेवेतील अधिकारी (आयएफएस) चतुर्वेदी यांनी आरटीआयच्या माध्यमातून सरकारकडे माहिती मागितली होती. जून २०१४ ते आतापर्यंत विदेशातून किती काळा पैसा भारतात आणला, अशी माहिती त्यांनी विचारली होती. याबाबत पीएमओला विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती यापूर्वीच करण्यात आली आहे. आणि त्यांचा तपासही सुरु आहे. असे पीएमओने म्हटले आहे.
अमेरिकन थिंक टँक ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटीच्या (जीएफआय) अहवालानुसार २००५ ते २०१४ दरम्यान भारतात सुमारे ७७० अब्ज डॉलर काळा पैसा आलेला आहे. या अहवालानुसार याच कालावधीत १६५ अब्ज डॉलर काळा पैसा देशाबाहेर गेला आहे. चतुर्वेदी यांना पीएमओने केंद्रीय मंत्र्यांविरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती देण्यासही नकार दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
रायगड
क्रिकेट
करमणूक
Advertisement