एक्स्प्लोर
जशोदाबेन मोदींकडून पंतप्रधानांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचं कौतुक
कोटा : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांनी मात्र नोटाबंदीच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा उत्तम निर्णय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
देशाची प्रगती आणि विकासासाठी केंद्र सरकार काम सुरु ठेवेल, अशी आशाही जशोदाबेन यांनी व्यक्त केली आहे. 'पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा केंद्राचा निर्णय भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. देशाबाहेर गेलेला काळा पैसा परत आणण्यासही मदत होईल' असं जशोदाबेन म्हणाल्या.
राजस्थानमधील एका कार्यक्रमाला जशोदाबेन यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती. मोदी सरकारच्या यशापयशाविषयी विचारलं असता जशोदाबेन यांनी कौतुकोद्गार काढले. केंद्र सरकार यापुढेही भारताच्या प्रगती आणि विकासासाठी काम सुरु ठेवेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या :
नोटाबंदीमुळे लोक नाराज, भाजप खासदार किरण खेर यांचा घरचा आहेर
नोटाबंदीबाबत सर्वांनी पंतप्रधानांना पाठिंबा द्यावा : आमीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement