एक्स्प्लोर
खोटं बोलून प्रसिद्धी मिळणाऱ्यांनाही माध्यमांबद्दल तक्रार : नरेंद्र मोदी
'खोटं बोलून देखील रोज वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळणाऱ्यांना माध्यमांबद्दल तक्रार असते', असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भाजपच्या 'मेरा बुथ सबसे मजबुत' या कार्यक्रमाअंतर्गत आंध्रप्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
नवी दिल्ली : 'खोटं बोलून देखील रोज वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळणाऱ्यांना माध्यमांबद्दल तक्रार असते', असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भाजपच्या 'मेरा बुथ सबसे मजबुत' या कार्यक्रमाअंतर्गत आंध्रप्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
"भारतात प्रत्येकजण माध्यमांबद्दल तक्रार करतो. काही जणांनी खोटं बोलून देखील त्यांना रोज वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्धी मिळते. तरीही ते माध्यमांबद्दल तक्रार करत असतात. तसेच ज्यांना प्रसिद्धी मिळत नाही अशा व्यक्तींना देखील माध्यमांबद्दल तक्रार असते त्यामुळे आपण माध्यमांना समजुन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे", असा कानमंत्र मोदींनी कार्यकर्त्यांना दिला.
"भाजपच्या कार्यकर्त्यांनी माध्यम क्षेत्रातील या लोकांशी चांगली मैत्री करणे गरजेचे आहे. माध्यमांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर अनेक व्यक्ती काम करत असतात. कॅमेरामन, रिपोर्टर यांच्यासह माध्यम संस्थांचे मालक यांचा देखील यात समावेश होतो. एखादा सामान्य कॅमेरामन देखील राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या इतकाच देशातील प्रश्नांबाबत संवेदनशील असतो. त्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा", असेही मोदी म्हणाले. यावेळी बोलताना मोदींनी ते 2001 साली पक्षसंघटनेत काम करत असतानाची आठवण देखील सांगितली. 'त्यावेळी मला देखील माध्यमांचा सामना करावा लागत असे. आज मी तुम्हाला जे काही सांगतो आहे ते त्याकाळी मला आलेल्या अनुभवावरून बोलतो आहे, असे ते म्हणाले.BJP Karyakartas across AP were asking me about the interface between political parties and the media.
Here’s what I said. I urge friends in the media hear it as well. I also recalled a memory from 2001 when I was working in the Party organisation. pic.twitter.com/fdJUuBQf8N — Narendra Modi (@narendramodi) January 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
लातूर
करमणूक
Advertisement