एक्स्प्लोर
मेरा भाषणही है शासन, 41 महिन्यात मोदींची 775 भाषणं
प्रत्येक महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली : 'मेरा वचन ही मेरा शासन है' हा 'बाहुबली 2' मधला शिवगामीचा डायलॉग बराच गाजला होता. मात्र त्याऐवजी आता 'मेरा भाषण ही मेरा शासन है' हे वाक्य जास्त फेमस होतंय की काय, असं वाटू लागलं आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 41 महिन्यात तब्बल 775 जाहीर भाषणं केली आहेत. प्रत्येक महिन्याला मोदींनी सरासरी 19 भाषणं दिल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच दर तीन दिवसांपैकी दोन दिवस त्यांनी जाहीर सभांमधून भाषण केल्याचं म्हणू शकतो. बहुतेक भाषणं ही किमान 30 मिनिटांची होती. त्याउलट मनमोहन सिंग यांनी 10 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत 1 हजार 401 भाषणं दिली. म्हणजेच महिन्याला सरासरी 11 भाषणं दिली. पण अवघ्या तीन वर्षात मोदींनी भाषणबाजीत मनमोहन सिंग यांना मागे टाकलं आहे. मोदींच्या भाषणाविषयी महत्त्वाचे मुद्दे : सप्टेंबर 2014 मध्ये एका महिन्यात मोदींची 31 भाषणं एप्रिल 2015 मध्ये मोदींच्या 32 जाहीर सभा 2015 मध्ये मोदींची जाहीर सभांमध्ये 264 भाषणं नोव्हेंबर 2015 या एकाच महिन्यात मोदींची 36 भाषणं बिहार निवडणुकीसाठी घेतलेल्या 4 सभांचाही समावेश परदेशांमधील भारतीयांसमोर मोदींची 166 भाषणं
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























