एक्स्प्लोर
कोलकाता-वाराणसी जलमार्गाने मालवाहतूक सुरू, पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण
कोलकात्याहून वाराणसीला गंगा नदीमार्गे निघालेले मालवाहतूक करणारे जहाज वाराणसीत पोहोचले आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या मालवाहतूक सेवेचे लोकार्पण करणार आहेत.

लखनौ : कोलकात्याहून वाराणसीला गंगा नदीमार्गे निघालेले मालवाहतूक करणारे जहाज वाराणसीत पोहोचले आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या मालवाहतूक सेवेचे लोकार्पण करणार आहेत. वाराणसीतील रामनगर मल्टी मॉडल टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर नदीमार्गे मालवाहक करणाऱ्या जहाजांची ये-जा सुरू होईल. कोलकात्याहून पेप्सी कंपनीचा 300 टन वजनाचा माल घेऊन हे मालवाहक जहाज वाराणसीच्या मल्टी मॉडल टर्मिनलवर दाखल झाले आहे. हा माल 16 कंटेनरमध्ये भरलेला आहे. दळणवळणमंत्री नितीन गडकरींनी त्यांचे स्वप्न साकार केले आहे. 30 ऑक्टोबर रोजी हे जहाज कोलकात्याहून 7 नॉटिकल मिल प्रतितास या वेगाने निघाले. 1400 किलोमीटरचे अंतर पार करत 7 नोव्हेंबर रोजी हे जहाज वाराणसीत दाखल झाले आहे. वाराणसीतील रामनगर येथे जहाजांसाठी जेट्टी बाधण्यात आली आहे. जेट्टीची उंची पाण्यापासू 60 फूट इतकी आहे. 220 मीटर लांबी असलेल्या या जेट्टीवर एकावेळी चार मालवाहक जहाजं उभी राहू शकतात. माल जहाजामध्ये लोड करण्यासाठी आणि उतरवण्यासाठी जर्मन कंपनीचे दोन क्रेन लावले आहेत. 150 फूट उंची उंची असलेले क्रेन एकावेळी जहाजातला 70 टन माल उचलू शकते. जलमार्गाने मालवाहतूक खूपच स्वस्त होते. रस्ते मार्गाने सरासरी एक टन मालाची वाहतूक करण्यासाठी प्रतिकिलोमीटर 2.50 रुपये लागतात. तर रेल्वे मार्गाने वाहतूक करण्यासाठी 1.25 रुपये खर्च येतो. परंतु जलमार्गाने वाहतूक केली तर केवळ पन्नास पैसे (0.5) पैसे इतका खर्च येतो. शिवाय नवे रोजगार देखील उबलब्ध होत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























