एक्स्प्लोर

Statue of Equality: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 216 फूट उंचीच्या 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वसंत पंचमीच्या मुहुर्तावर वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या Statue of Equality चे अनावरण केले. रामानुजार्य यांच्या या भव्य पुतळ्यासाठी 1 हजार कोटी रुपये लागलेत.

PM Narendra Modi Inaugurates Statue of Equality: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज वसंत पंचमीच्या मुहुर्तावर वैष्णव संत रामानुजाचार्य स्वामी यांच्या 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे अनावरण केले. रामानुजार्य यांच्या या भव्य पुतळ्यासाठी एक हजार कोटी रुपये लागलेत. हा पुतळा रामानुजाचार्य मंदिरातच स्थापन करण्यात आलेला आहे. त्यापूर्वी पंतप्रधान मोदी शमशाबाद येथील 'यज्ञशाळा' येथे पोहोचले. तेथील धार्मिक अनुष्ठानात ते सहभागी झाले. रामानुजाचार्य हे 11 व्या शतकातील संत आणि समाज सुधारक आहेत. त्यांचा 216 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. पंचधातूपासून बनलेला हा पुतळा जगातील सगळ्यात मोठा दुसरा पुतळा आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये या पुतळ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वामी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण ही त्यांना योग्य श्रद्धांजली ठरणार आहे, असं ट्विट देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी केलं होतं.

रामानुजाचार्य यांनी राष्ट्रीयत्व, लिंग, वंश, जात किंवा पंथ या सर्वांना समान मानून लोकांच्या उद्धारासाठी अथक कार्य केले आहे. समतेच्या पुतळ्याचे अनावरण हा बारा दिवस चालणाऱ्या रामानुजन सहस्त्राब्धी समारंभाचा एक भाग आहे. रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंतीनिमित्त हा सोहळा सध्या सुरू आहे. वैष्णव संत रामानुजाचार्य यांची 1000 वी जयंतीनिमित्त सुरु झालेल्या या कार्यक्रमामध्ये 2 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 35 कुंडांतून 14 दिवस महायज्ञाचा कार्यक्रम केला जाणार आहे.

रामानुजाचार्य यांनी विश्वास, जात आणि वंश यासह जीवनाच्या कोणत्याही स्तरावर समतेच्या कल्पनेचा पुरस्कार केला. पंचधातू म्हणजे सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक या पंचधातूंनी रामानुजाचार्य यांचा 216 फूट उंचीचा हा पुतळा साकार झाला आहे. हा बैठक स्थितीतील पुतळा जगात सर्वाधिक उंचीचा पुतळा आहे. हा 54 फूट उंच अश्या भद्रवेदी नामक इमारतीवर उभारला आहे. त्या इमारतीमध्ये डिजिटल वैदिक ग्रंथालय व संशोधन केंद्र, प्राचीन भारतीय लिखाण, नाट्यगृह, शैक्षणिक गॅलरी आहे.  रामानुजाचार्य यांच्या पुतळ्य़ाची कल्पना रामानुजाचार्य आश्रमाचे चिन्ना जीयार स्वामी यांची आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयसीआरआयएसएटी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, हैदराबाद जवळच्या पतंचेरूमधील, आयसीआरआयएसएटी–म्हणजेच, निम-शुष्क उष्णकाटिबंधीय प्रदेशातील कृषिपीकविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेला भेट देत, या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारंभाचा शुभारंभ केला. तसेच, आयसीआरआयएसएटी संस्थेमधील, हवामान बदलाच्या संकटात रोपांचे संरक्षण करण्यासंदर्भातील संशोधन सुविधा आणि रॅपिड जनरेशन एडव्हॅन्समेंट- म्हणजेच, जलदगतीने होणाऱ्या पिढी संक्रमण संशोधन सुविधेचेही त्यांनी उद्घाटन केले. या दोन्ही सुविधा, आशिया आणि आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आल्या आहेत. तसेच, आयसीआरआयएसएटी च्या विशेष लोगोचे आणि या प्रसंगानिमित्त जारी करण्यात आलेल्या विशेष टपाल तिकीटाचेही त्यांनी अनावरण केले. तेलंगणाच्या राज्यपाल, तामिळीसाई सौंदरराजन, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि जी किशन रेड्डी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Politics : नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 721 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही घसरण, गुंतवणूकदारांचे 4.75 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 721 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही घसरण, गुंतवणूकदारांचे 4.75 लाख कोटी स्वाहा
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री : संतोष बांगर
Santosh Bangar: मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री : संतोष बांगर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

One Plus Nord CE 5 : स्मार्ट लूक, दमदार बॅटरी, किंमत किती? वनप्लस Nord CE 5 ची A टू Z माहिती
All-Indian Final | महिला विश्वचषकाची अंतिम लढत दोन भारतीय खेळाडूंमध्ये
Ketaki Chitale Controversy | केतकी चितळेच्या वक्तव्यांनी मराठी भाषाप्रेमी संतप्त, Saamana ही चर्चेत
RSS Muslim Dialogue | मोहन भागवत-Muslim विचारवंत भेट, अनेक मुद्द्यांवर चर्चा
BAMU Admissions Stopped | BAMU चा धाडसी निर्णय, 113 Colleges चे PG प्रवेश थांबवले!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Politics : नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Share Market Crash : शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 721 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही घसरण, गुंतवणूकदारांचे 4.75 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजारात भूकंप, सेन्सेक्स 721 अंकांनी कोसळला, निफ्टीमध्येही घसरण, गुंतवणूकदारांचे 4.75 लाख कोटी स्वाहा
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
कंत्राटदाराच्या फायद्यासाठी सा.बां. विभागातील अभियंत्याची बॅटिंग; बनावट कागदपत्रे बनवली, गुन्हा दाखल
मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री : संतोष बांगर
Santosh Bangar: मला आरोग्य मंत्री व्हायला आवडेल, माणिकराव कोकाटे सर्वात चांगला मंत्री : संतोष बांगर
मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान
मी पदावरून रिटायर झाल्यानंतर कुठलंही शासकीय पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवईंचं मोठं विधान
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एका वर्षात 12बँकांचा परवाना रद्द, महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश, यादी समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून एका वर्षात 12बँकांचा परवाना रद्द, महाराष्ट्रातील 3 बँकांचा समावेश, यादी समोर
Ahilyanagar Crime : डीजे हटवण्याच्या कारणावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, घर अन् गाड्यांची लाठ्याकाठ्यांनी तोडफोड; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
डीजे हटवण्याच्या कारणावरून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी, घर अन् गाड्यांची लाठ्याकाठ्यांनी तोडफोड; अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना
Rajasthan School Building Collapse: विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
Embed widget