एक्स्प्लोर
Gujarat Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान अपघात का झाला?; अखेर चौकशी अहवाल समोर, नेमकं काय घडलं?
Gujarat Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाची मोठी दुर्घटना घडली होती.
Gujarat Air India Plane Crash
1/12

Gujarat Air India Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने (Gujarat Air India Plane Crash) संपूर्ण देश हादरला.
2/12

लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही मिनिटांमध्येच भीषण अपघात झाला, यात 275 जणांचा मृत्यू झाला होता.
3/12

दरम्यान, एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
4/12

अहमदाबाद येथील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते.
5/12

विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळल्याचं समोर आलं आहे.
6/12

एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना इंधनपुरवठा ठप्प झाल्यानं झाल्याचं प्राथमिक चौकशी अहवालात म्हटलं आहे.
7/12

उड्डाणानंतर तीन सेकंदांतच दोन्ही इंजिनचा इंधनपुरवठा ठप्प झाला.
8/12

तसेच इंधनपुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवादही समोर आला आहे.
9/12

इंधन पुरवठा का बंद केला? असा पायलटनं सह पायलटला प्रश्न विचारला. यावर मी काहीच केलं नाही असं सह पायलटनं प्रत्युत्तर दिले.
10/12

इंधन पुरवठा ठप्प झाल्यानंतर 29 व्या सेकंदांस एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यामुळे 2018 च्या एफएएच्या मार्गदर्शिकांकडे एअर इंडियाचं दुर्लक्ष झाल्याचं समोर येत आहे.
11/12

अहमदाबाद विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला.
12/12

मृतांमध्ये राज्यातील 9 जणांचा समावेश आहे. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला.
Published at : 12 Jul 2025 08:03 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























