Rajasthan School Building Collapse: विद्येच्या प्रांगणात निष्पाप जीवांच्या मृत्यूचे तांडव; सरकारी शाळेतील वर्गाचे छत कोसळून सात विद्यार्थ्याचा जीव गेला, 28 गंभीर जखमी
Rajasthan School Building Collapse: प्रार्थनेची वेळ झाली तेव्हा शाळेच्या मैदानात सर्व वर्गातील मुलांना एकत्र करण्याऐवजी त्यांना खोलीत बसवण्यात आले. त्यानंतर काही वेळातच छत कोसळले आणि 35 मुले चिरडली

Rajasthan School Building Collapse: राजस्थानमधील झालावाड येथे एका सरकारी शाळेच्या इमारतीचं छत कोसळल्याने 7 मुलांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले. झालावाडच्या मनोहरथाना ब्लॉकमधील पिपलोडी सरकारी शाळेतील एका वर्गात मुले बसली होती तेव्हा खोलीचे छत कोसळले आणि त्याखाली 35 मुले गराड्यात चिरडली. घटनास्थळी पोहोचलेल्या ग्रामस्थांनी तत्काळ ढिगारा काढून मुलांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मनोहरथाना रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, 5 मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला.
#BREAKING: Rajasthan: A Govt School building collapsed in Jhalawar.
— زماں (@Delhiite_) July 25, 2025
◆ 5 children have died, over 30 injured.
◆ 11 are in critical condition.
Rescue operations are ongoing.
Another tragedy, another crumbling system. When will govt schools get safety, not just slogans? pic.twitter.com/4mNRTovohP
सर्व मुले प्रार्थनेसाठी जमली होती
गावकऱ्यांनी सांगितले की सकाळपासूनच पाऊस पडत होता. प्रार्थनेची वेळ झाली तेव्हा शाळेच्या मैदानात सर्व वर्गातील मुलांना एकत्र करण्याऐवजी त्यांना खोलीत बसवण्यात आले जेणेकरून ते भिजू नयेत. त्यानंतर काही वेळातच छत कोसळले आणि 35 मुले चिरडली. गावकऱ्यांनी सांगितले की, या शाळेत एकूण 7 वर्गखोल्या आहेत. अपघातावेळी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये 71 मुले होती. 2 शिक्षकही शाळेत उपस्थित होते, परंतु छत कोसळण्याच्या वेळी ते इमारतीबाहेर होते, ते सुरक्षित आहेत.
निष्काळजीपणा उघड
1. जिल्हाधिकारी अजय सिंह राठोड यांच्या म्हणण्यानुसार, शालेय शिक्षण विभागाला जीर्ण इमारतीतील शाळा बंद करण्याचे आधीच निर्देश देण्यात आले होते, परंतु जिल्हाधिकारी स्वतः म्हणत आहेत की ही शाळा जीर्ण इमारतींच्या यादीत नव्हती आणि येथे मुले बंद नव्हती.
2. शाळेत शिकणारी वर्षा राज क्रांती ही मुलगी म्हणाली की, छत कोसळण्यापूर्वी गिलावा पडत होता, मुलांनी बाहेर उभ्या असलेल्या शिक्षकांना याबद्दल माहिती दिली, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही आणि काही वेळाने छत कोसळले.
घटनेचा तपास सुरू होण्यापूर्वीच शाळेची इमारत पाडण्यात आली
मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेले लोक सापडण्यापूर्वीच प्रशासनाने शाळेची उर्वरित संपूर्ण इमारत पाडली. प्रशासनाने प्रथम वर्गखोलीचा ढिगारा जेसीबीने काढला, त्यानंतर संपूर्ण इमारत पाडण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या


















