(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kashi Vishwanath Temple Corridor : मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन; म्हणाले...
Kashi Vishwanath Temple Corridor : पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन. मोदी म्हणाले, काशीत केवळ डमरुवाल्यांचंच सरकार!
Kashi Vishwanath Temple Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन करण्यासाठी वाराणसीला पोहोचले. पंतप्रधान मोदी सर्वात आधी काशीतील कोतवाल काल भैरव मंदिरात पोहोचले होते. जिथे त्यांनी पूजा केली. पंतप्रधान मोदींनी काल भैरवाची आरतीही केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी जेव्हा बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी लोकांचं अभिनंदन केलं. त्यावेळी लोकांनी हर-हर महादेव अशा घोषणाही दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आत्ता मी पण येतोय बाबांसोबत नगर कोतवाल कालभैरव पाहून. मी देशवासीयांसाठी त्यांचे आशीर्वाद घेऊन येत आहे. काशीमध्ये काहीही नवीन झालं, तर ते त्यांना विचारणं आवश्यक आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काशीत प्रवेश करताच सर्व बंधनातून मुक्त होतो असे आपल्या पुराणात सांगितले आहे. भगवान विश्वेश्वराच्या आशीर्वादाने, येथे आल्याबरोबर एक अलौकिक ऊर्जा आपल्या अंतर्मनाला जागृत करते.
काशीत केवळ डमरुवाल्यांचंच सरकार : पंतप्रधान
मोदी म्हणाले की, "काशी तर काशी आहे! काशी तर अविनाशी आहे. काशीमध्ये एकच सरकार आहे, ज्याच्या हातात डमरु आहे, त्याचंचं सरकार आहे. जिथे गंगा आपला प्रवाह बदलून वाहते, त्या काशी कोण रोखू शकतं?"
75000 हजार भक्त परिसरात येणार
पंतप्रधान म्हणाले की, काशी विश्वनाथ मंदिर परिसर जे केवळ 3000 चौरस फुटांचं होतं, आता जवळपास 5 लाख चौरस फुटांचं झालं आहे. आता 50,000 ते 75,000 भक्त मंदिर आणि परिसरात येऊ शकणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीच्या खिडकिया घाटावर पोहोचले. तिथून मोदी क्रूझवरुन ललिता घाटावर जाण्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदींनी त्यानंतर गंगेत स्नान केलं आणि पूजा केली. काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन केलं. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. काशी विश्वनाथ मंदिराला गंगा नदीशी जोडणारे सगळे मार्ग सहजतेने जोडण्याचे काम या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले आहे. हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फूट एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पसरला आहे, तर पूर्वीची जागा फक्त 3000 चौरस फूट इतकी मर्यादित होती. कोविड महामारी असूनही, प्रकल्पाचे काम नियोजित वेळापत्रकानुसार पूर्ण झाले आहे. याची सुरुवात 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करुन झाली होती.
दरम्यान, 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ कॉरिडोरचं भूमीपूजन करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर दोन वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत या कॉरिडॉरचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. यासाठी 445 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
- काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन 339 कोटी रुपये खर्च आलाय
- दररोज जवळपास 2000 मजुरांनी काम केलंय.
- कॉरिडोरचा संपूर्ण परिसर जवळपास 5 लाख चौरसफुटांपर्यंत पसरला आहे.
- कॉरिडोर तयार करण्यासाठी जवळपास 400 इमारतींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.
- पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट तयार करण्यासाठी 1 वर्ष नऊ महिन्यांचा काळ लागला आहे.
असं आहे काशी विश्वनाथ धाम :
खर्च | 339 कोटी (पहिला टप्पा) |
मजूर | 2000 (दररोज) |
परिसर | 5 लाख चौरसफूट |
भूमी अधिग्रहण | 400 इमारती |
वेळ | 2 वर्ष 9 महीने |