केंद्राने पुरवलेले व्हेंटिलेटर वापराविना पडून, पंतप्रधानांकडून नाराजी; तातडीने ऑडिट करण्याचे आदेश
राज्यांनी आकडेवारीचं भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट प्रामाणिकपणे कराव्यात असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात टेस्टिंग अजून वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र आणि राज्य सरकारांची चिंता वाढली आहे. देशातल्या कोरोना स्थितीचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यात पीएम केअर फंडच्या माध्यमातून मिळालेले व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेतली. केंद्राने पुरवलेल्या व्हेंटिलेटरचा वापर, सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
राज्यांनी आकडेवारीचं भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट प्रामाणिकपणे कराव्यात असा सल्ला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पॉझिटिव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात टेस्टिंग अजून वाढवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, हाय पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या भागात टेस्टींग वाढवल्या पाहिजेत. गाव-खेड्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. खेड्यांमध्ये डोअर टू डोर टेस्टिंग आणि सर्व्हिलान्सची व्यवस्था करावी
Nashik Ventilator : नाशिकमध्ये पीएम केअर फंडमधून मिळालेले 60 व्हेंटिलेटर धूळखात पडून
मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात सुमारे 50 लाख चाचण्या घेण्यात येत होत्या. एप्रिलमध्ये ही संख्या वाढून 1.3 कोटी चाचण्या केल्या जात होत्या, असं बैठकीत सांगण्यात आले. देशभरात ऑक्सिजना तुटवडा जाणवत आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी ग्रामीण भागात ऑक्सिजनचा योग्य पुरवठा करण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. आरोग्य कर्मचार्यांना व्हेंटिलेटर व इतर उपकरणे चालवण्यास प्रशिक्षित केले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.
ग्रामीण भागातही ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी यंत्रणा सक्षम करण्याबाबत पंतप्रधान मोदींनी आदेश दिले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना फैलाव रोखणे गरजेचं आहे. यासाठी गरजेच्या उपकरणांची व्यवस्था महत्त्वाचे आहे. तसेच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना सशक्त बनवण्यावर जोर दिला पाहिजे. तसेच ग्रामीण भागात ऑक्सिजन सप्लाय निश्चित करण्यासाटी डिस्ट्रिब्युशन पॉलिसी तयर केली पाहिजे. यात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्सचाही समावेश होणार, असा पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- भारताला लवकरच Pfizer चे पाच कोटी डोस मिळण्याची शक्यता, चर्चा अंतिम टप्प्यात
- 'गंगाने बुलाया है' असं म्हणणाऱ्यांनी गंगेला अश्रू दिले; काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधानांवर घणाघाती टीका
- Corona Vaccination : ब्रिटनने दोन डोसमधील अंतर कमी केलं, आठ आठवड्यात मिळणार कोरोनाचा दुसरा डोस
- Mamata Banerjee Brother Death | ममता बॅनर्जी यांच्या धाकट्या भावाचं कोरोनामुळे निधन