एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'गंगाने बुलाया है' असं म्हणणाऱ्यांनी गंगेला अश्रू दिले; काँग्रेस नेते राहुल गांधींची पंतप्रधानांवर घणाघाती टीका

उत्तर प्रदेशात गंगा नदीमध्ये अनेक प्रेतं तंरंगताना दिसत आहेत. यावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील कोरोनाच्या स्थितीवरुन सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. जी व्यक्ती गंगाने बुलाया है असं म्हणत होती त्यांनेच गंगा नदीची वाताहत केली, तिला अश्रू दिले अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीत मोठ्या प्रमाणावर प्रेतं तरंगत असल्याचं दिसून येतंय. 

राहुल गांधी म्हणाले की, "जी व्यक्ती सांगत होती की गंगाने मला बोलवलंय, त्याच व्यक्तीने गंगाला अश्रू दिले आहेत." 

 

उत्तर भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. ही वाढ एवढी मोठी आहे की त्यामुळे प्रेतांना अग्नी द्यायला स्मशानभूमींची संख्या कमी पडत आहे. अशावेळी अनेक प्रेतं गंगा नदीमध्ये सोडली जात आहेत. एका हिंदी दैनिकाच्या वृत्तानुसार, गंगा नदीत दोन हजारांहून जास्त प्रेतं सोडण्यात आली आहेत.त्यावर राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केलीय.

त्या आधी एक दिवस काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, "बालिया आणि गाजीपूरमध्ये गंगा नदीमध्ये प्रेतं तरंगत आहेत. उन्नावमध्ये नदी किनारी मोठ्या प्रमाणावर प्रेत जाळल्याच्या बातम्या येत आहेत. लखनऊ, गोरखपूर, झाशी आणि कानपूर या शहरांत कोरोनाचे आकडे कमी करुन सांगितले जात आहेत."

राहुल गांधींनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या आधी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की, "देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी रंगाचा चश्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही."

महत्वाच्या बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget