(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी वाढ
मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 95 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
मुंबई : देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज डिझेलच्या दरात 30 पैशांची वाढ झाली आहे, तर इतर शहरांमध्येही किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आत्तापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. मंगळवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.
इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार शनिवारी आज दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर 88.44 रुपये आहे, तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 94.93 रुपयांवर पोहोचलं आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 89.73 रुपये तर चेन्नईमध्ये प्रति लिटर 90.70 रुपये आहे. त्याचबरोबर, डिझेलचे दर दिल्लीत आज 78.74 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 85.70 रुपये आहे, कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर 82.33 रुपये, चेन्नईमध्ये डिझेलचा दर 83..86 रुपये आहे.
देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
शहर | पेट्रोल | डिझेल |
मुंबई | 94.93 रुपये | 81.96 रुपये |
नवी दिल्ली | 88.44 रुपये | 78.38 रुपये |
कोलकाता | 89.73 रुपये | 81.96 रुपये |
चेन्नई | 90.70 रुपये | 83.52 रुपये |
बंगळुरू | 91.40 रुपये | 83.47 रुपये |
हैदराबाद | 91.96 रुपये | 85.89 रुपये |
पटना | 90.84 रुपये | 83.95 रुपये |
जयपूर | 94.86 रुपये | 87.04 रुपये |
लखनौ | 87.22 रुपये | 79.11 रुपये |
मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 95 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ लागली आहे, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची अंदाज वर्तवला जात आहे.
इंधन कसे महाग होते?
परदेशी बाजारातून कच्चे तेल अत्यंत स्वस्त किंमतीत मिळते. पेट्रोल पंपावर येता येता ते महाग होतं. त्यात कोणते कर जोडले जातात? भारत पेट्रोलियम पदार्थ आपल्या गरजेजनुसार आयात करतो म्हणजे दुसर्या देशातून खरेदी करतो. तेल आयात केल्यानंतर ते रिफायनरीला पाठवले जाते. येथे या कच्च्या तेलामधून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ काढले जातात. रिफायनरीमधून हे तेल पेट्रोल आणि डिझेल विकणार्या कंपन्यांना जाते. जसे इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्रोलियम. या कंपन्या त्यांचा नफा काढून घेतात. या कंपन्या पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंपावर वाहतूक करतात, त्यानंतर पेट्रोल पंप मालक देखईल विकताना कमिशन घेतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 2 प्रकारचे कर देखील जोडले जातात. केंद्र सरकारची उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारांचं व्हॅट. व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर दर जो प्रत्येक राज्यात वेगळा असतो. हे सर्व जोडल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत तीनपट महाग होते.
संबंधित बातम्या