मुंबईच्या फुटपाथवर चक्क पेट्रोल पंप, अवैध पद्धतीनं विकलं जात होतं डिझेल
पोलिसांनी या कारवाईत 14 हजार लिटर डिझेल जप्त केले आहे. राघवेंद्र ठाकूर नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत.
मुंबई : एरवी पेट्रोल पंप आपल्याला रस्त्याच्या बाजूला आणि व्यवस्थित जागेवर पाहायला मिळतो. मात्र मुंबई पोलिसांनी धारावी आणि माहिम या ठिकाणी फुटपाथवर एका कंटेनरमध्ये सुरू असलेल्या डिझेल विक्रीचा भांडाफोड केला असून 14 हजार लिटर डिझेल जप्त केले आहे. तर राघवेंद्र ठाकूर नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याचे साथीदार फरार झाले आहेत.
मुंबईच्या रस्त्यांवर कधी काय मिळेल याचा नेम नाही. मुंबईच्या फुटपाथवर डिझल विकले जात असल्याची माहिती मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेला मिळताच आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकत त्यांच्यावर कारवाई केली. राघवेंद्र ठाकूरच्या MS WEST CARE कंपनीला क्लीन अप कॉन्ट्रॅक्ट महानगरपालिकेकडून देण्यात आलं होतं. यासाठी 150 गाड्या लागणार होत्या आणि या गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी चक्क फूटपाथवरच कंटेनर टाकून त्याच्यामध्ये डिझेलची टाकी ठेवण्यात आली. या 150 गाड्यांमध्ये डिझेल भरण्यासाठी माहीम आणि धारावी येथील फूटपाथवर असलेल्या कंटेनरमधील डिझेल भरत होते. कारवाई करत मुंबई पोलिसांनी 14 हजार लिटर डिझेल जप्त केले आणि एम एस वेस्ट या कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या राघवेंद्र ठाकूरला अटक केली. तर या कंपनीचे डायरेक्टर फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहान केलं आहे की, अशा गैररित्या मार्गाने पेट्रोल किंवा डिझेल भरू नये आणि जर कोणी असं करत असेल तर त्याची माहिती पोलिसना तात्काळ द्यावी.
संबंधित बातम्या :