एक्स्प्लोर

Mount Everest : अनंत अमुची ध्येयासक्ती...आजच्या दिवशी एडमंड हिलरी आणि तेनजिंग नॉर्गे यांची एवरेस्ट मोहीम फत्ते

सर एडमंड हिलरी (Sir Edmund Hillary)आणि तेनजिंग नॉर्गे (Tenzing Norgay) यांनी 29 मे 1953 साली पहिल्यांदा जगातील सर्वात उंच पर्वत माऊंट एवरेस्ट (Mount Everest) सर केला होता. 

नवी दिल्ली : जगाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा ऐतिहासिक असाच आहे. आजच्या दिवशीच म्हणजे 29 मे 1953 साली न्यूझिलंडचे सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनजिंग नॉर्गे यांनी जगातील अशक्य अशा वाटणाऱ्या सर्वात उंच माऊंट एवरेस्टची मोहीम सर केली होती. त्या आधी या एवरेस्टवर चढाई करणे म्हणजे केवळ स्वप्न होतं. 

माऊंट एवरेस्ट हा जगातील सर्वात मोठा आणि चढाईस कठीण असा पर्वत आहे. भौगोलिक दृष्ट्या नेपाळमध्ये वसलेल्या या पर्वताची उंची ही 8848 मीटर आहे. 1953 सालाच्या पूर्वी अनेकांनी या पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता पण सर्वांनाच अपयश आलं होतं. स्वत: सर एडमंड हिलरी यांनी एवरेस्ट दोन वेळा सर करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात ते अयशस्वी ठरले होते. पण हिलरी यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही. 1953 साली त्यांनी आपला सहकारी तेनजिंग नॉर्गे यांच्या सोबत पुन्हा एकदा एवरेस्ट सर करण्याची मोहीम आखली.

शेवटी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या सहाय्याने त्यांनी 29 मे 1953 रोजी एवरेस्टवर आपला झेंडा रोवला. त्यांच्या या धाडसाचं जगभरातून कौतुक होऊ लागलं. ब्रिटनच्या राणीने त्यांना 'नाईट' ची उपाधी दिली. पण हिलरी एडमंड यांना मिळालेला हा सन्मान नेपाळच्या शेर्पा तेनजिंग नॉर्गे यांना मिळाला नाही. त्यानंतर एडमंड हिलरी यांनी पुढच्या काही वर्षात हिमालयातील अनेक पर्वतं सर केली. हिमालयातील पर्वतांवर प्रेम करणाऱ्या सर एडमंड हिलरी यांनी नेपाळच्या शेर्पा लोकांच्या आयुष्यात बदल आणण्यासाठीही काही प्रयत्न केले. त्यांनी शेर्पा लोकांच्या मुलांसाठी शाळा, हॉस्पिटल्स, अनेक नद्यांवर पूल बांधले. इतरही अनेक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 

माऊंट एवरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती ठरलेले न्यूझिलंडचे सर एडमंड हिलरी यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत पर्यावरणासंबंधी काम केलं. त्यांनी 1953 साली केलेल्या कामगिरीमुळे आज अनेक लोकांचा आत्मविश्वास वाढला असून जगातले सर्वात उंच पर्वत सर करणं आता मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीसमोर मोठं राहिलं नाही. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
Embed widget