Petrol Diesel Price : इंधन दरात दिलासा कधी मिळणार? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol-Diesel Price on 6 December : तुमच्या शहरात पेट्रोल, डिझेलचे दर काय? जाणून घ्या...
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असले तरी भारतात ग्राहकांना अद्यापही मोठा दिलासा मिळाला नाही. जवळपास महिनाभरापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मागील महिन्यात केंद्र सरकारने उत्पाद शुल्कात काही प्रमाणात कपात केली होती. तर, इतर राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये कपात करत इंधन दर शंभर रुपयांसाठी आणण्याचा प्रयत्न केला.
राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये सोमवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 109.98 प्रतिलीटर आणि 94.14 प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 101.40 रुपये आणि 91.43 रुपये आहेत.
पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लीटर 110.71 इतका आहे. पुण्यात पेट्रोल दरात 50 पैशांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ झाली असून 93.45 रुपये प्रति लीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दर 111.64 रुपये इतका असून डिझेलचे दर 95.79 रुपये प्रतिलीटर इतके आहेत. नागपूरमध्ये पेट्रोलच्या दरात 21 पैशांनी घट झाली आहे. नागपूरमध्ये आता पेट्रोल दर 109.71 रुपये प्रतिलीटर इतका झाला आहे. तर, डिझेलच्या दरात 20 पैशांनी घट झाली आहे. डिझेलची किंमत 92.53 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Fuel Price : जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल; भारतातील कोणतं शहर?
- Fuel Price : क्रूड ऑइलच्या दरात घट, तरीही भारतात इंधन दर का घटेना? जाणून घ्या कशी होईल दर कपात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha