Fuel Price : जगातील 'या' शहरांमध्ये मिळतेय सर्वात महाग पेट्रोल; भारतातील कोणतं शहर?
World's 10 Most Expensive Cities For Petrol: जगातील इतर देशांमध्येदेखील पेट्रोलचे महाग आहेत. इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटने शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे.
World's 10 Most Expensive Cities For Petrol: भारतात पेट्रोल, डिझेलच्या किमती अधिक असल्याने लोकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. लोकांमधील नाराजी कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीमध्ये कपात केली होती. तर, काही राज्यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी वॅटमध्ये कपात केली. मात्र, तरीदेखील सामान्य नागरिकांच्यादृष्टीने पेट्रोलची किंमत अधिक आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिटने (EIU) प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार, सर्वाधिक महाग पेट्रोल असणाऱ्या 10 देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकाही भारतीय शहराचा समावेश नाही.
हाँगकाँग
या यादीत हाँगकाँग पहिल्या स्थानी आहे. हाँगकाँगमध्ये पेट्रोल सर्वात महाग आहे. येथे 2011 मध्ये पेट्रोलची किंमत 2.13 डॉलर प्रति लीटर होती. सन 2016 मध्ये हा दर 1.73 डॉलर प्रति लीटर पर्यंत खाली आली. त्यानंतर सन 2020 मध्ये किंमत पेट्रोलची किंमत 2.19 डॉलरपर्यंत वाढली आणि आता 2021 मध्ये ती 2.50 डॉलरपर्यंत वाढली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत जवळपास 188.10 रुपये इतकी होते.
ॲम्स्टरडॅम
नेदरलँड्समधील ॲम्स्टरडॅममध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 2.18 डॉलर इतकी झाली आहे. सन 2011 मध्ये पेट्रोलची किंमत 2.40 डॉलर इतकी होती. तर, 2016 मध्ये 1.69 डॉलर इतकी झाली होती. तर, 2020 मध्ये पेट्रोलचा दर 1.91 डॉलर इतका झाला.
ओस्लो
नॉर्वेतील ओस्लो शहर हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन 2021 मध्ये पेट्रोलची किंमत 2.06 डॉलर आहे. सन 2011 मध्ये पेट्रोलचे दर 2.62 डॉलर प्रती लीटर होती. तर, 2016 मध्ये 1.54 डॉलर इतकी किंमत झाली. त्यानंतर 2020 मध्ये 1.76 डॉलर इतका दर झाला.
तेल अवीव
EIU च्या अहवालानुसार, 2021 मध्ये, येथे एक लीटर पेट्रोलची किंमत दोन डॉलर आहे. तर, 2011 मध्ये किंमत 2.05 डॉलर प्रति लीटर होती, जी 2016 मध्ये 1.45 डॉलरपर्यंत घसरली आणि 2020 मध्ये 1.65 डॉलरपर्यंत वाढली.
हॅम्बर्ग
जर्मनीमध्ये हॅम्बर्गमध्ये 2021 मध्ये एका लीटरची किंमत 2 डॉलर इतकी होती. 2011 मध्ये 2.05 डॉलर प्रति लीटर इतका दर होता. सन 2016 मध्ये यामध्ये कपात झाल्यानंतर 1.45 डॉलर इतका दर झाला. त्यानंतर 2020 मध्ये 1.65 डॉलर इतकी झाली.
यादीत आणखी कोणते शहर?
EIU अहवालानुसार, ग्रीसची राजधानी अथेन्स सहाव्या स्थानी (2021 मध्ये 1.98 डॉलर), इटलीमधील रोम सातव्या स्थानी (2021 मध्ये 1.98 डॉलर), स्वीडनचे स्टॉकहोम आठव्या स्थानी (2021 मध्ये1.97 डॉलर), आइसलँडचे रेकजाविक नवव्या स्थानी (2021 मध्ये 1.97 डॉलर) आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: