एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today : आजचे इंधनाचे दर जारी; 'या' शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, तुमच्या शहरांतील किमती काय?

Petrol-Diesel Price Today 05 January 2022 : इंधन कंपन्यांनी नववर्षाच्या पाचव्या दिवशी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price Today 05 January 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. तेल वितरण कंपन्यांनी आज (बुधवारी) म्हणजेच, 5 जानेवारी 2022 रोजी पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) च्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या बाजारात तेजीची नोंद झाली आहे. रात्रीच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक ब्रेंट क्रूड फ्युचर्सची किंमत 0.39 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $ 79.29 वर पोहोचली होती.

भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. गेल्या दोन महिन्यांत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

Petrol-Diesel Price Today : आजचे इंधनाचे दर जारी; 'या' शहरात सर्वात स्वस्त पेट्रोल, तुमच्या शहरांतील किमती काय?

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या शहरात? 

देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेयरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 82.96 रुपये आणि डिझेल 77.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. राज्य स्तरावर वाहनांच्या इंधनावर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या (VAT) वेगवेगळ्या दरांमुळे राजस्थानमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकलं जात आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोल (Petrol) 112 रुपये प्रति लिटर आहे. महानगरांबाबत बोलायचं झालं तर दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Rate) सर्वात स्वस्त आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल आणि डिझेल दोन्हींच्या किमतींमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. दिल्ली व्यतिरिक्त इतर सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलनं शतक पार केलं आहे. 

देशातील महानगरांतील आजचे दर :

देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Beed Crime: वाल्मिक कराड एकटा बड्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखू शकत नाही, संदीप क्षीरसागरांनी पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची मदत, पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case :आरोपी कृष्णा आंधळेला अटक कधी होणार?, Dhananjay Deshmukh यांनी दर्शवली नाराजीDevendra Fadnavis On Uddhav Thackeray : 2019  मध्ये पवार, ठाकरेंची निवडणुकीआधीच हातमिळवणी : फडणवीसSantosh Deshmukh Case : Dhananjay Munde आणि कराड नाण्याच्या दोन बाजू  : Suresh DhasAnjali Damania On Santosh Deshmukh Case : जप्त केलेल्या 2 मोबाईलमधील डेटा अद्याप का मिळाला नाही?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America on Indian Migrants : गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
गेल्या 10 वर्षात तब्बल 12 हजार 546 भारतीय अमेरिकेतून हद्दपार, आता दुसरी यादी सुद्धा तयार; हातपायात बेड्या पाहून भारताने आता कोणती भूमिका घेतली?
Nandurbar : नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
नंदुरबारमध्ये उकिरड्यात सापडली गोपनीय कागदपत्रं; बँकेचे चेक, नोटीस अन् आधार कार्डचा खच पाहून सगळेच चक्रावले
Chhattisgarh Naxal Encounter : छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
छत्तीसगडमध्ये 12 नक्षलींचा खात्मा, चकमकीत 2 जवान शहीद, 2 जखमी; विजापूरच्या नॅशनल पार्क परिसरात चकमक
Beed Crime: वाल्मिक कराड एकटा बड्या पोलीस अधिकाऱ्यांना रोखू शकत नाही, संदीप क्षीरसागरांनी पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची मदत, पुणे कनेक्शनही खोदून काढलं?
Pankaja Munde : वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
वाल्मिक कराड दिंडोरीच्या आश्रमात आल्याचा तृप्ती देसाईंचा आरोप, आता पंकजा मुंडे त्याच स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमाला पोहोचल्या; चर्चांना उधाण
Delhi Election : दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
दिल्लीत आपचे 'पानीपत' अन् महाराष्ट्रात महाविकास आघाडीला कडक संदेश; आता अरविंद केजरीवाल कोणती भूमिका घेणार?
Home loan: कर्जदारांना लवकरच मिळणार गिफ्ट, होमलोनचा EMI होणार कमी? लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता
रेपो रेट कमी झाल्याने मध्यवर्गीयांना आनंदाची बातमी मिळणार, होम लोनचा EMI कमी होणार?
Bacchu Kadu : मोठी बातमी : बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, आमदारकीच्या पराभवानंतर आता 'या' पदावर अपात्रतेची टांगती तलवार
Embed widget