दिवाळीत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार. तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
![दिवाळीत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या आजचे दर Petrol Diesel Price in 25 October 2022 petrol diesel price in delhi mumbai check latest rate here maharashtra marathi news दिवाळीत पेट्रोल-डिझेलच्या किमतींत सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या आजचे दर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2017/10/04073310/1-petrol-diesel-prices-in-indias-neighbourhood.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price in 25 October 2022 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) सातत्यानं चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. आधीच महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही दिलासा मिळालेला नाही. आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
कच्च्या तेलाच्या किमती काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे मंगळवारी 91 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहे. अलीकडेच, OPEC+ देशांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 2 दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आली होती.
देशातील प्रमुख महानगरात इंधन दर काय?
- दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई : पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
- कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
- चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
राज्यातील प्रमुख शहरांत दर काय?
- नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
- कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
- औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)