एक्स्प्लोर
पेट्रोलच्या दरात सात, डिझेलच्या दरात पाच पैशांनी कपात
सलग 16 दिवस इंधनदरवाढीनंतर आता वाहनचालकांना किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे.
मुंबई : सलग 16 दिवस इंधनदरवाढीनंतर आता वाहनचालकांना किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. पेट्रोलचे दर सात पैसे, तर डिझेलचे दर पाच पैशांनी कमी झाले आहेत.
सलग 16 दिवस इंधनाच्या दरात घसघशीत वाढ झाल्यानंतर, काल म्हणजे सतराव्या दिवशी इंधन दर 60 पैशांनी कमी झाल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे वाहनचालकांनी सुटकेचा निश्वासही टाकला होता, मात्र दुपारी तेल कंपन्यांनी कोलांटउडी मारली. इंधन दरात केवळ एक पैशांची कपात झाल्याचं सांगितलं.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले. त्यात पेट्रोलमध्ये 60 पैसे आणि डिझेलमध्ये 57 पैशांची कपात झाल्याचा उल्लेख होता. परंतु एक तासाभरातच कंपन्यांनी तांत्रिक चूक झाल्याचं सांगत दरांमध्ये बदल केले. म्हणजेच ग्राहकांना केवळ एक पैशाचाच दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे.
तेल कंपन्यांची गलती से मिस्टेक, पेट्रोलमध्ये 60 नाही तर 1 पैशांची कपात!
पेट्रोल दरकपातीबाबत केलेल्या अक्षम्य चुकीबद्दल पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र, इंधनाच्या किमती तेल कंपन्या ठरवतात, त्यामध्ये सरकारचा काहीच हात नसतो, असा दावा प्रधान यांनी केला. सलग 16 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रोज पै-पै ने वाढ होत असली, तरी एकूण 16 दिवसांच्या कालावधीत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.8 रुपये तर डिझेलच्या दरात 3.37 रुपयांनी वाढ झाली होती. पेट्रोल-डिझेल नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाल्यामुळे मोठा फटका बसतो. इंधनदरवाढीसोबतच दूध, भाजीपाला जीवनावश्यक वस्तूंचे दरही वधारतात. संबंधित बातम्या रोज पै-पै ने वाढणाऱ्या पेट्रोलची रुपयातील वाढ किती?इंधनदरवाढ सलग 15 व्या दिवशी सुरुच, पेट्रोल 12 पैशांनी महाग इंधन दरवाढीवर लवकरच दीर्घकालीन उपाययोजना : अमित शाह पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्राच्या हालचाली इंधन दरात दहाव्या दिवशी वाढ, देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावतीत पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच राहणार : केंद्र सरकार देशात सर्वात महाग पेट्रोल अमरावती, औरंगाबादमध्ये! पाकिस्तानपेक्षा भारतात पेट्रोल 33 रुपये प्रति लिटरने महाग कशामुळे? ... तर पेट्रोल 53 रुपये आणि डिझेल 41 रुपये लिटरने मिळेल पेट्रोल-डिझेलची आगेकूच, स्वत:चा विक्रम मोदींनी अनेकवेळा मोडला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement