Bengaluru Crime News: 'हो, मी तिला मारलं'; इस्रोच्या 76 वर्षीय माजी कर्मचाऱ्याने पत्नीला संपवलं, शेजाऱ्यांना फोन केला अन् सांगितलं की, 'माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल...'
Bengaluru Crime News: संध्या जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेल्या दिसल्यानंतर अपार्टमेंटमधील डॉक्टरांना बोलावण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असल्याने तेथे २४ तास रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध असतात.

Bengaluru Crime News: बंगळुरू (Bengaluru) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल, या भीतीतून निवृत्त इस्रो कर्मचाऱ्याने हे कृत्य (Bengaluru Crime News) केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यानंतर त्याने आत्महत्येचा विचार केला; मात्र घाबरल्याने तो निर्णय बदलल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासाचा हवाला देत, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की राव गंभीर नैराश्याने ग्रस्त होते.(Bengaluru Crime News)
काही मानसिक समस्यांवर उपचार
नागेश्वर राव (७६) असे आरोपीचे नाव असून ते इस्रो (Indian Space Research Organisation) मध्ये टीम लीडर पदावर कार्यरत होते. सध्या ते काही मानसिक समस्यांवर उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना व्हाईटफिल्ड परिसरातील बोम्मनहळ्ळी येथील ‘द व्हर्चुओसो’ या ज्येष्ठ नागरिकांच्या निवासी संकुलात बुधवारी सकाळी घडली.(Bengaluru Crime News)
जवळपास २० मिनिटे मृतदेहाशेजारी बसून
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.१५ वाजता संध्या श्री (६३) या स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना राव यांनी टॉवेलने त्यांचा गळा आवळला. त्या बेशुद्ध पडल्यावर राव जवळपास २० मिनिटे मृतदेहाशेजारी बसून होते. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्याला फोन करून “मी पत्नीची हत्या केली आहे” असे सांगितले. सुरुवातीला शेजाऱ्याला हा विनोद वाटला; मात्र राव वारंवार तेच सांगू लागल्याने शेजारी तातडीने घरी आले.
तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले
संध्या जमिनीवर निश्चल अवस्थेत पडलेल्या दिसल्यानंतर अपार्टमेंटमधील डॉक्टरांना बोलावण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असल्याने तेथे २४ तास रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध असतात. तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि पोलिसांना माहिती दिली.
माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार?
पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा राव सोफ्यावर बसलेले होते. त्यांनी गुन्ह्याची कबुली देत, “मी अजून तीन-चार वर्षांपेक्षा जास्त जगणार नाही. माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार?” असे सांगितले. हे दाम्पत्य मूळचे आंध्र प्रदेशातील असून त्यांनी तीन वर्षांपूर्वी हा फ्लॅट खरेदी केला होता. त्यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत स्थायिक आहे.
या घटनेने पोलिस व ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. बंगळुरूमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सामूहिक निवासी संकुलांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता ही घटना चिंताजनक मानली जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि नागेश्वरला ताब्यात घेतले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "तो नैराश्यावर उपचार घेत होता आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता. घटनेनंतर त्याला आत्महत्या करायची होती, म्हणूनच त्याने त्याच्या पत्नीचा जीव घेतला. सध्या दुसरे कोणतेही कारण समोर आलेले नाही."
























