एक्स्प्लोर

धक्कादायक! लग्नपत्रिकेत नाव नसल्याने वाद, धुळ्यातील कौटुंबिक सोहळ्यात धारदार भांडण, तिघांचा मृत्यू

पोलिसांनी याप्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना आणि वाहनचालकाला ताब्यात घेतले होते. तर रात्री आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले

धुळे : जिल्ह्याच्या साक्री (Dhule) तालुक्यातील पिंपळनेर येथे एका कौटुंबिक विवाह समारंभ प्रसंगी दोन गटात वाद झाल्याची घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. या वादातून धारदार शस्त्राने वार केल्याने तीन जणांचा मृत्यू झाला होता, तर दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत सोनू गोसावी, देवेंद्र पवार यांचा जागीच मृत्यू झाला असून, साई गोसावी यांचा धुळ्यात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता, या हत्याकांडामागील किरकोळ कारण समोर आलं असून लग्नपत्रिकेत नाव न टाकल्याने हा वाद सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी (Police) आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना आणि वाहनचालकाला ताब्यात घेतले होते. तर रात्री आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे एका विवाह सोहळ्यात भाऊबंदांमध्ये वाद होऊन साखरपुड्याच्या मंडपात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली या घटनेत धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यात 3 जणांचा मृत्यू झालं असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील भांडणाचं प्रमुख कारण आता समोर आलंय. 

या वादामागील मूळ कारण आता समोर आले असून लग्न पत्रिकेत सोनगड (गुजरात) येथील गोसावी समाजातील लोकांची नावे का नमूद केली नाहीत, यावरून सोनगड येथे काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता. तसेच गोसावी समाजातील लग्न समारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्व कोणाचे असावे, यावरून सोनगड व पिंपळनेर येथील गोसावी समाजातील व्यक्तींमध्ये मतभेद सुरू होते. या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातला पळून जाताना अटक

पिंपळनेर पोलिसांनी या घटनेतील आरोपी ब्रेझा कारमधून गुजरातला पळून जात असताना सापळ रचून अटक केली. पोलिसांनी ओटाबरी या गुजरात बॉर्डर घाटातील रहिवाशांना गाडीचा नंबर देऊन ट्रॅफिक जाम करण्यास सांगितले. त्यातून घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून हे तिन्ही आरोपी गुजरात राज्यातील सोनगड येथील रहिवासी असून याप्रकरणी कांतीलाल गोसावी (वय 42) आणि जसवंत गोसावी (वय 36) आणि वाहनचालक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी काल पोलिसांनी तीन जणांना अटक केल्यानंतर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अनिल हट्टू गोसावी याला गुजरातमधून पिंपळनेर पोलिसांनी अटक केली. अनिल गोसावी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप स्टेटस ठेवत चेथावणी दिल्याचा देखील प्रकार यातून समोर आला आहे.

हेही वाचा

Bhiwandi Mayor: दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी कोण?

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
धक्कादायक! 8 महिन्यांच्या बाळावरुन वाद, 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सासऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
स्वाभिमानीच्या जिल्ह्याध्यक्षाने थेट बँक मॅनेजरच्याच कानशिलात लगावली, बुलढाण्यातील सेंट्रल बँकेत धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  
सोलापुरात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, तब्बल 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 48 हजारांहून अधिक बनावट मद्याच्या बाटल्याही जप्त  

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget