
Passport At Post Office : आता पासपोर्टसाठी पायपीट करण्याची गरज नाही, जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Passport At Post Office : आता पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया आणखी सुलभ झाली असून तुम्ही तुमच्या घराच्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करु शकता.

Passport At Post Office : परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणं आवश्यक असतं. नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाकडून हा पासपोर्ट जारी केला जातो. परदेशात जाण्याची परवानगी देण्यासाठी पासपोर्ट देण्यात येतो. तसेच परदेशात गेल्यानंतर वपासपोर्ट एखाद्या व्यक्तीचं ओळखपत्र म्हणूनही काम करतो. अशातच नागरिकांच्या सुविधेसाठी आणि पासपोर्ट प्रक्रिया जलद होण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं आता नवी सुविधा सुरु केली आहे.
'भारतीय डाक' अर्थातच पोस्ट ऑफिस अशी ओळख असलेल्या कार्यालयात आता पासपोर्ट बनविण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. देशभरात 424 पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. केंद्राच्या जवळ राहणाऱ्या व्यक्ती पासपोर्टसाठी अर्ज दाखल करु शकतात. या सुविधेसाठी नागरिकांना आपल्या जवळील पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जावं लागेल. इंडिया पोस्टनं काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "आता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सीएसी काउंटरवर पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या."
पासपोर्ट इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, नव्या प्रणाली अंतर्गत, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर, सर्व अर्जदारांना अर्जाची प्रिंट पावती आणि मूळ कागदपत्रांसह पासपोर्ट सेवा केंद्रात शारीरिकरित्या उपस्थित राहणे अनिवार्य आहे. परंतु, परंतु पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी, अर्जदाराने त्याच्यासोबत महत्वाची कागदपत्रे ठेवणे आवश्यक आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल.
पासपोर्टचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी :
1. ओळखपत्र म्हणजेच, आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा कोणतंही फोटो असलेलं वैध ओळखपत्र
2. जन्माचा दाखला, शाळा-कॉलेज सोडल्याचा दाखला
3. ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅन कार्ड
4. घरचा पत्ता असणारं ओळखपत्र म्हणजेच, वीजबिल, पाणी बिल, मोबाईलचा बिल
5. बँक खाते, पासबुक, भाड्याचे अॅग्रीमेंट
असा करा अर्ज
पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट passportindia.gov.in वर लॉगइन करा. सर्वात आधी तुम्हाला पासपोर्टसाठी अर्ज करणारा फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मूळ दस्तावेज आणि पासपोर्टसाठी दाखल केलेल्या फॉर्मची प्रिंट घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि योग्य ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 7 ते 14 दिवसांमध्ये पासपोर्ट जारी केला जातो. परंतु, लक्षात ठेवा आपला पासपोर्ट अर्ज सादर करण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देणे अनिवार्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
