एक्स्प्लोर

PAN-AADHAAR Link : पॅन आणि आधार लिंक केलं? अजून नाही? मग आजच करा, जाणून घ्या प्रक्रिया

PAN Card आणि Aadhaar लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. परंतु, तुम्ही शेवटच्या तारखेची वाटच पाहू नका. लवकरात लवकर पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करा.

How to link PAN with Aadhaar : Pan Card आणि Aadhar Card लिंक करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासनाकडूनही वेळोवेळी यासंदर्भात आवाहन करण्यात येत आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) शनिवारी करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत वाढवली आहे. केंद्र सरकारने बँक खाते, मोबाईल क्रमांक यासाठी आधार लिंक अनिवार्य केलं आहे. शिवाय एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्राने केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे. याव्यतिरिक्त सीबीडीटीच्या नियमांनुसार आयकर भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे करण्यात आले आहे. बनावट पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.

PAN Card आणि Aadhaar लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. परंतु, तुम्ही शेवटच्या तारखेची वाटच पाहू नका. लवकरात लवकर पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक करा. पॅन कार्ड आधारशी लिंक करणं अत्यंत सोपं आहे. तुम्ही अगदी सहज ऑनलाईनही करु शकता. 

Google वर सर्वाधिक सर्च करण्यात येणाऱ्या लिंकपैकी एक 

या वर्षातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या विषयांपैकी एक म्हणजे, पॅनला आधारशी लिंक करण्याचा मुद्दा. गुगल सर्च इंजिनवर लोकांनी त्याचा प्रचंड शोध घेतला. दरम्यान, यामागे एक मोठं कारण होतं की, याआधी या दोन कागदपत्रांना लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 होती. आता यासाठी मुदवाढ देण्यात आली असून PAN Card आणि Aadhaar लिंक करण्यासाठी शेवटची तारिख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे.

आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल? 

  • आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.
  • वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.
  • दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.

पॅनकार्ड लिंक करण्यासाठी असा करा एसएमएस :

आयकर विभागकडून वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीत पॅन कार्ड आधार कार्डशी कसं लिंक करावं हे सांगण्यात आलं आहे. असं करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर मेसेज करायचा आहे. UIDPAN (स्पेस) तुमचा आधार नंबर (स्पेस) तुमचा पॅनकार्ड नंबर असा SMS या 567678 किंवा 56161 नंबरवर करा.

पॅन-आधार लिंक न केल्यास काय होईल?

तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलं नसेल, तर तुमचा पगारही रोखला जाऊ शकतो. कंपन्या करमर्यादेवर असलेल्या पगारावरील टीडीएस कापून घेतात. मात्र तुमच्याकडील पॅन क्रमांक रद्द झाल्यास कंपनीला तसं करता येणार नाही.

पॅन आधारशी लिंक असल्याचे फायदे

जर तुमचा पॅन क्रमांक आधार कार्डाशी लिंक असेल, तर तुम्हाला नवीन बँक खातं सहज उघडता येईल. तुम्हाला आयटीआर भरतानाही कोणती अडचण येणार नाही. तुम्ही जर गुंतवणुकीच्या दृष्टीने शेअर बाजाराचा विचार करत असाल तर कुठल्याही म्युच्युअल फंडाचे युनिट खरेदीसाठी आणि डीमॅट अकाऊंट ओपन करणं सोपं जाईल. नवीन डेबिट अथवा क्रेडिट कार्ड घेणंही सोयीचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा लाईव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget