900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या बॉसला उपरती, माफी मागत म्हणाला...
900 Employees fires : झूम मिटिंगवर (Zoom Meeting) 900 नोकरीवरुन काढल्याबद्दल सीईओ विशाल गर्ग यांनी माफी मागितली आहे.
900 Employees fires : झूम मिटिंगवर (Zoom Meeting) 900 नोकरीवरुन काढल्याबद्दल सीईओ विशाल गर्ग यांनी माफी मागितली आहे. विशाल गर्ग यांनी झूम मिटिंगमध्ये अवघ्या तीन मिनिटांमध्ये 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी केले. विशाल गर्ग यांनी ज्या पद्धतीने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, त्यावरुन लोक त्यांच्यावर टीका झाली. आता विशाल गर्ग यांना माफी मागावी लागली आहे. अमेरिकन कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ विशाल गर्ग यांनी त्यांच्या कंपनी Better.com मधील 900 कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. कंपनीने या निर्णयाबाबत कोणतीही सूचना अथवा इशारा दिला नव्हता. Better.com या कंपनीमध्ये जपानमधील एक सॉफ्ट बँकेची गुंतवणूक आहे. सध्या या कंपनीचे बाजारमूल्य 7 अब्ज डॉलर इतके आहे.
कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही, मात्र झूम कॉलद्वारे 900 लोकांना नोकरीवरून कमी करण्याती पहिलीच वेळ आहे. सीईओ विशाल गर्ग यांनी बैठकीत कर्मचारी काम करत नसल्याचा आरोप केला. तुम्ही लोक फक्त दोन तास काम करतात, कंपनीच्या व्यवसायात, कामात कोणतेही योगदान देत नसल्याचे त्यांनी म्हटले. या झूम कॉलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे विशाल गर्ग यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. यानंतर आता विशाल गर्ग यांनी कंपनीच्या 900 कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने कामावरून काढले त्याबद्दल माफी मागितली आहे.
काय म्हणाले विशाल गर्ग?
विशाल गर्ग यांनी माफी मागताना म्हटलं की, ''आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती देताना आपण मोठी चूक केली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याती पद्दत चुकीची होती. या पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांवरील कठीण प्रसंगात आणखी भर पडली. अशा पद्धतीने कर्कामचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याचे सांगणे चुकीचे होते.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- 'या' देशात मिळणार दोनपेक्षा अधिक विक ऑफ, काही दिवसच करावं लागणार काम
- CDS बिपिन रावत यांच्या निधनानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया
- Black Box : विमान, हेलिकॉप्टर दुर्घटनेत महत्त्वाचा असतो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय करतो काम?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha