![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
RBI गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, डिजीटल करन्सी येणार, पण....
Central Bank Digital Currency: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुढील वर्षी डिजीटल करन्सी लाँच करणार आहे. मात्र, काही मुद्यांवर गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली.
![RBI गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, डिजीटल करन्सी येणार, पण.... Digital Frauds Remain Concern For Central Bank Digital Currency says RBI Governor Shaktikanta Das RBI गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, डिजीटल करन्सी येणार, पण....](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2018/12/18150052/shaktikanta-das.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RBI Central Bank Digital Currency : रिझर्व्ह बँकेकडून सेंट्रल बँक डिजीटल करन्सी (CBDC) आणण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी आणि डिजीटल करन्सी विधेयक संसदेत सादर करणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. डिजीकल करन्सीसमोर सायबर सुरक्षा आणि डिजीटल फसवणुकीचा धोका असल्याचे त्यांनी म्हटले.
सेंट्रल बँक डिजीटल करन्सी (CBDC)बाबत काही महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, काही, 'किचकट' पैलूंवर आणखी काम करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण होण्यास काही वेळ लागणार असल्याचे डेप्युटी गर्व्हनर टी. रबी शंकर यांनी 'पीटीआय'ला सांगितले.
या वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँकेने सेंट्रल बँक डिजीटल करन्सीवर (CBDC) काम करण्यास सुरुवात केली असल्याचे जाहीर केले होते. जगातील काही देशांच्या बँकांनी डिजीटल करन्सीवर काम करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षापासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रायोगिक तत्वावर डिजीटल करन्सी सुरू करणार असल्याचे म्हटले जात आहे.
आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले की, सायबर सुरक्षा आणि संभाव्य डिजीटल फसवणूक हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आम्हाला त्याबाबत अतिशय सावधगिरी बाळगावी लागणार आहे. CBDC बाजारात आल्यानंतर बनावट चलनं समोर येण्याची शक्यता आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी फायरवॉल, मजबूत सायबर सुरक्षा तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, बुधवारी रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे व्याजदरात कोणताही बदल होणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- ITR: तुम्ही स्वत: भरा आयकर रिटर्न'; जाणून घ्या सोपी पद्धत
- रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; व्याज दर जैसे थे!
- 2000 रुपयांच्या नोटा मार्केटमधून कमी झाल्या? केंद्रानं संसदेत सांगितलं 'हे' कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)