Pakistani Model : करतारपूर साहिब गुरुद्वारातील पाकिस्तानी मॉडेलचं फोटोशूट वादात, अखेर मागितली माफी
Pakistani Model Photoshoot : एका पाकिस्तानी मॉडेलनं करतारपूर साहिब गुरुद्वारा येथे फोटोशूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं वाद निर्माण झाल्यानं अखेर मॉडेलला माफी मागावी लागली.
![Pakistani Model : करतारपूर साहिब गुरुद्वारातील पाकिस्तानी मॉडेलचं फोटोशूट वादात, अखेर मागितली माफी Pakistani model apologies after photoshoot controversy at kartarpur sahib gurudwara Pakistani Model : करतारपूर साहिब गुरुद्वारातील पाकिस्तानी मॉडेलचं फोटोशूट वादात, अखेर मागितली माफी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/30/891899beae241543455ae5f3e958ba87_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pakistani Model Photoshoot : एका पाकिस्तानी मॉडेलनं करतारपूर साहिब गुरुद्वारा दरबार येथे फोटोशूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं वाद निर्माण झाला. अनेकांनी या फोटोवर आक्षेप घेत शीख समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप केला. त्याचं कारण म्हणजे या फोटोमध्ये मॉडेलचं डोकं झाकलेलं नाही. या वादानंतर मॉडेल सौलेहाने इंस्टाग्रामवरील फोटो डिलीट करत माफी मागितली आहे.
मन्नत क्लोदिंग (Mannat Clothing) या कपड्यांच्या ब्रँडने सोमवारी, आपल्या इंस्टाग्राम पेजवर करतारपूर साहिबमध्ये शूट केलेल्या मॉडेल सौलेहाचे फोटो पोस्ट केले. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते मनजिंदर सिंह सिरसा आणि नेटकऱ्यांनी मॉडेलचं डोकं झाकलं नसल्याचा मुद्दा उपस्थित करत फोटो शेअर केले. गुरुद्वारामध्ये डोकं झाकणं अनिवार्य असते. त्यामुळे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले.
Such behaviour & act at pious place of Sri Guru Nanak Dev Ji is totally unacceptable!
">
Can she dare to do the same at her religious place in Pakistan?@ImranKhanPTI @GovtofPakistan shd tk immed action to stop this trend of treating Sri Kartarpur Sahib as picnic spot by Pak people pic.twitter.com/AwyIkmqgbC
मॉडेल सौलेहानं मागितली माफी
मॉडेल सौलेहानं माफी मागत म्हटलं की, ''कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि हे फोटो त्यांच्या करतारपूर साहिब गुरुद्वारा भेटीच्या स्मरणार्थ होते.'' तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "अलीकडेच मी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. जो कोणत्याही शूटचा किंवा कशाचाही भाग नव्हता. मी फक्त इतिहास जाणून घेण्यासाठी आणि शीख समुदायाबद्दल जाणून घेण्यासाठी करतारपूरला गेले होते."
पोलिसांकडून तपास सुरु
शिरोमणी अकाली दलाचे प्रवक्ते मनजिंदर सिंह सिरसा यांच्या ट्विटनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पोलिसांनी सांगितलंय की, यो फोटोशूट संदर्भात सर्व बाबींची चौकशी करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
हे ही वाचा :
-
Parliament Winter Session Updates: 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
-
12 Rajya Sabha MP Suspended : पुरुष मार्शलनी महिला खासदारांना धक्काबुक्की केली, प्रियांका चर्तुवेदी यांची निलंबनावर प्रतिक्रिया
-
Mamata Banerjee Mumbai Visit : दीदींचं पॉवर पॉलिटिक्स! उद्या 'सिल्वर ओक'वर शरद पवारांसोबत भेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)