एक्स्प्लोर
भाजपचं मिशन बंगाल जारी, ममता बॅनर्जींचा अजून एक आमदार भाजपात
लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही भाजप आणि टिएमसीमधील वाद सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मोदींनी ममता दीदींचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते.
कोलकाता : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे देशभरातील अनेक पक्षांमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरु झाले आहे. गेल्या 24 तासात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) तिसऱ्या आमदाराने पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपचा हात धरला आहे.
तृणमूल काँग्रेसचे आमदार मुनीरुल इस्लाम यांनी आज (बुधवारी) भाजपत प्रवेश केला आहे. इस्लाम यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे नेते गदाधर हाजरा, मोहम्मद आसिफ इकबाल आणि निमई दास या तिघांनीदेखील भाजपत प्रवेश केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपने काल तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे आमदार शुभ्रांशु रॉय आणि तुषार कांती भट्टाचार्य यांच्यासह 50 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपच्या गळाला लागले. तसेच सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला. ही घटना ताजी असतानाच आज टीएमसीचा अजून एक आमदार भाजपच्या गळाला लागला आहे.
लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही भाजप आणि टिएमसीमधील वाद सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मोदींनी ममता दीदींचे 40 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता ममता यांचे तीन आमदार भाजपमध्ये गेले आहेत. तसेच भाजपमध्ये इतर नेत्यांचेही इनकमिंग सुरु झाले आहे. पश्चिम बंगालमधल्या लोकसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल टीएमसी 22 भाजप 18 काँग्रेस 2Trinamool Congress MLA Manirul Islam joins Bharatiya Janata Party in Delhi. TMC's Gadadhar Hazra, Mohd Asif Iqbal and Nimai Das also join BJP. pic.twitter.com/Y2rOILuZ2f
— ANI (@ANI) May 29, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement