मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आयुष मंत्रालयाने केले सूर्यनमस्काराचे आयोजन, 75 लाख लोकांचा सहभाग
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज केंद्रीय आयुष मंत्रालयने सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील सहभागी झाले होते.
Surya Namaskar 2022 : दरवर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो . या दिवसापासून उत्तरायण सुरू होते असे म्हटले जाते. याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज केंद्रीय आयुष मंत्रालयने सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सुर्यनमस्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात देश विदेशातील 75 लाख लोक सहभागी झाल्याची माहिती सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे.
याबाबत आयुष मंत्रालयाने सांगितले की, सूर्याच्या प्रत्येक किरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्याला नमस्कार म्हणून 'सूर्य नमस्कार' केले जात आहेत. कारण सूर्य सर्व सजीवांचे पोषण करतो असे मंत्रालयाने म्हटले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्यनमस्कार रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आणि जीवनशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. याकाळात प्रत्येकाच्या आरोग्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच सूर्यप्रकाशापासून मानवी शरीराला ड जीवनसत्व मिळत आहे. हे जगभरातील वैद्यकीय शाखांमधील सशोधनातून स्पष्ट झाले असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.
सामूहिक सूर्यनमस्काराच्या माध्यमातून हावामान बदलाचा सामना करणे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. आजच्या जगात, हवामान बदल ही एक जागतीक समस्या तयार झाली आहे. त्यामुले याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा वापरल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणाऱ्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल असेही मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशात मकर संक्रांतीचे महत्त्व अधोरेखित करेल असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो
बारा राशींमधील एक मकर रास आहे, सूर्य एका राशिमधून दुसर्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रमण त्यालाच संक्रांती असे म्हटले जाते. त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशीच सूर्य धनु राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मीचे दिवस सुरू होतात.
महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो. या 3 दिवसांमध्ये संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी, भोगीच्या दुसर्या दिवशी संक्रांत आणि संक्रांतीच्या किंक्रांत अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते.
महत्त्वाच्या बातम्या: