(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron: घाबरू नका पण काळजी घ्या; ओमायक्रॉनवर दिलासा देणाऱ्या 5 मोठ्या गोष्टी
Omicron world updates : ओमायक्रॉनच्या व्हेरियंटबाबत भीती बाळगली जात आहे. मात्र, या व्हेरियंटबाबत अधिक भीती न बाळगण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
Omicron variant updates : दक्षिण आफ्रिकेत मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात तब्बल १६ हजार ओमायक्रॉन (omicron)बाधित रुग्ण आढळलेत. येत्या काही महिन्यात ओमायक्रॉन डेल्टापेक्षा जास्त फैलावणारा होईल, असे युरोपीयन युनियन आणि ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांचं म्हणणे आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुधारत असतानाच ओमायक्रॉन व्हेरियंटनं पुन्हा जगभरात दहशत पसरवली आहे. मात्र, ओमयाक्रॉनच्या दहशतीत पाच गोष्टी दिलासादायक ठरणाऱ्या आहेत.
38 देशांमध्ये फैलावला; एकही मृत्यू नाही
कोरोनाचा नवा व्हेरियंट (omicron) आतापर्यंत जगातील 38 देशांमध्ये फैलावला आहे. बाधितांची संख्या जवळपास 16 हजारांच्या घरात गेली आहे. मात्र, अद्याप एकाही बाधिताचा मृत्यू ओमायक्रॉनमुळे झाला नाही. त्याशिवाय या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर बाधितांमध्ये कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षण दिसले नाही. त्यामुळे ओमायक्रॉनची अनावश्यक भीती न बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग आदी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आतापर्यंत इतर व्हेरियंटच्या तुलनेत अधिक गंभीर नाही
सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ओमायक्रॉन प्रकार आणि त्याच्याशी संबंधित लक्षणे इतर व्हेरियंटपेक्षा वेगळा किंवा अधिक गंभीर असल्याचे सूचित करणारा कोणताही पुरावा अद्याप मिळाला नसल्याचे सांगण्यात आले.
लस न घेणारे सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित
ओमायक्रॉन व्हेरियंटची बाधा ही लस घेणाऱ्यांना अधिक प्रमाणात होत असल्याचे बोत्सवानाचे शास्त्रज्ञ आणि वायरोलॉजिस्ट डॉ. एस मोयो यांनी सांगितले. लसीकरण झालेल्या व्यक्तींना विषाणूंपासून अधिक सुरक्षा मिळायला हवी असेही त्यांनी म्हटले. बोत्सवानामध्ये जीनोम सिक्वेसिंगनंतर ओमायक्रॉन बाधितांची संख्या 19 झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेत बाधितांची संख्या 200 झाली आहे.
भारतात ओमायक्रॉनला डॉक्टरने दिली मात
भारतात बंगळुरू मध्ये ओमायक्रॉनचे दोन बाधित आढळले होते. यामध्ये एक 46 वर्षीय डॉक्टरदेखील आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला त्यांनी सांगितले की, अंगदुखी, थंडी वाजणे, हलका ताप येणे आदी लक्षणे दिसून आली होती. श्वास घेण्यास त्रास झाला नसल्याचे त्यांनी म्हटले. ऑक्सिजन सॅच्युरेशन पातळीदेखील सामान्य होती असेही त्यांनी म्हटले. सध्या ओमायक्रॉन बाधित डॉक्टरची प्रकृती चांगली असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: