(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India, Omicron Cases Tally : महाराष्ट्रातील 4 नव्या रुग्णांसह देशातील संख्याही वाढली, एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 65 वर
Omicron Variant : देशात ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, आंध्रप्रदेशसह चंदीगड राज्यात आढळलेल्या नव्या रुग्णांमुळे रुग्णसंख्या आणखी वाढली आहे.
India, Omicron Cases Tally : कोरोना महामारीने सर्वांची चिंता वाढवली असताना आता ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटमुळे जगभरातील नागरिक अधिक चिंतेत पडले आहेत. त्यात भारतातही ओमायक्रॉन रुग्णांची संख्या अधिक वाढत असल्याचे समोर आले आहे. आज नव्याने आढळलेल्या रुग्णांमुळे देशातील ओमायक्रॉन बाधितांची संख्या 65 झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 32 ओमायक्रॉनचे रुग्ण असल्याने राज्य सरकारची चिंता अधिक वाढली आहे.
दक्षिण आफ्रिका देशात उदयास आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा प्रसार जगभरात वेगाने होत आहे. हा विषाणू याआधीच्या सर्व विषाणूंपेक्षा अधिक जलदगतीने पसरत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. पण या विषाणूची लक्षणं आधीच्या तुलनेत काहीशी सौम्य असली तरी याचा प्रसाराचा गती धोकादायक आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस यांनी ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनमुळे किमान एक बळी गेल्याची माहिती नुकतीच दिली होती. त्यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्रात 32 ओमायक्रॉनचे रुग्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आत्तापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या 32 ओमायक्रॉन बाधितांपैकी 25 रूग्णांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळं या 25 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. ही काहीशी दिलाशाची बाब आहे. मात्र हा दिलासा कायम राहणार का हा प्रश्न आहे कारण ओमायक्रॉन व्हेरियंटवर आपल्या कोरोना लशी परिणाम कारक नसतील अशी भीती नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी व्यक्त केलंय. सध्या देशात 53 कोरोना रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. आणि हा प्रसार आणखी वेग पकडण्याची भीती आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात 925 कोरोनाबाधितांची नोंद तर 10 रुग्णांचा मृत्यू
- Dangerous Apps : तुमच्या स्मार्टफोनमधील 'हे' अॅप धोकादायक, आताचं करा अनइंस्टॉल
- Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha