(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये
Netflix Subscription : नेटफ्लिक्स (Netflix) च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. नेटफ्लिक्सचा महिन्याचा प्लॅन आता केवळ 149 रुपयांना करण्यात आला आहे.
Netflix Subscription : नेटफ्लिक्स (Netflix) च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता नेटफ्लिक्सने आता भारतामध्ये सबस्क्रिप्शनच्या (Subscription) किंमतीमध्ये कपात केली आहे. नेटफ्लिक्सचा महिन्याचा प्लॅन आता केवळ 149 रुपयांना करण्यात आला आहे. त्यामुळे Netflix चा फक्त मोबाईल प्लॅन 199 रुपये प्रति महिना दरात होता, तो आता 149 रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. त्यामुळे नेटफ्लिक्स प्रेमींच्या खिशाला काहीसा आराम मिळणार असून त्यांच्या मनोरंजनातही भर पडेल. Netflix ने आपल्या भारतातील किंमती कमी केल्या आहेत. आता मोबाईल प्लॅन 149 रुपये प्रति महिना उपलब्ध असेल.
2016 मध्ये सेवा सुरू झाल्यापासून Netflix प्रथमच भारतातील किंमती कमी करत आहे. याला कारण म्हणजे ओटीटी विश्वातील वाढत्या स्पर्धेत टिकून राहणे आणि युजर्सची संख्या वाढवणे.
यामुळे नव्या प्लॅननुसार, 199 रुपये प्रति महिना मोबाईल प्लॅनची किंमत आता. 149 असेल. 499 रुपयांचा बेसिक प्लॅन आता 199 रुपये प्रति महिना किंमतीला असेल. तर, स्टँडर्ड प्लॅन ज्यासाठी आधी महिन्याला 649 रुपये आकारले जायचे तो प्लॅन आता महिना 499 रुपयांना उपलब्ध होईल. नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा प्रीमियम टियर प्लॅन जो अल्ट्रा हाय-डेफिनिशन (Ultra HD) चार समवर्ती स्क्रीनसाठी सपोर्ट करतो, त्याची किंमत आता 799 रुपये प्रति महिनावरून 649 रुपये प्रति महिना करण्यात आली आहे.
पूर्वी मनोरंजनासाठी प्रेक्षकांना खास सिने-नाट्यगृहात जावे लागत असे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मने यावर तोडगा काढत क्रांती घडवून आणली. ओटीटी प्लॅटफॉर्म हा मनोरंजनाचा एक उत्तम पर्याय आहे. कोरोनाकाळात ओटीटी माध्यमाचे महत्त्व लोकांना पटलं आहे. लॉकडाऊनमुळे लोकं घरात बंदिस्त होते. अशावेळेस ओटीटी माध्यम हा सर्वोत्तम पर्याय ठरला होता. नेटफ्लिक्स आता प्रेक्षकांसाठी अनोळखे राहिलेले नाही. नेटफ्लिक्सवर सर्व प्रकरच्या कथानकांचा समावेश असतो. त्यामुळे दर कमी झाल्याने नेटफ्लिक्स प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.
नेटफ्लिक्स इंडियाच्या मोनिका शेरगिल यांनी सांगितले की, 14 डिसेंबरपासून नवे दर लागू होणार असून विद्यमान सदस्यांसाठी एक नवीन स्वयं-अपग्रेडचा पर्याय असेल. यामध्ये वापरकर्त्यांचे सध्याचे चालू प्लॅन आपोआप नव्या प्लॅनमध्ये अपग्रेड होतील. उदाहरणार्थ, जर वापरकर्ता जुन्या रु. 499 बेसिक प्लॅनवर असेल आणि त्यांनी अपग्रेड पर्याय निवडल्यास ते आपोआप पुढील 'स्टँडर्ड प्लॅन'वर अपग्रेड होतील ज्याची किंमत आता 499 रुपये आहे.
इतर बातम्या :
- Pushpa: The Rise चित्रपटाची चर्चा, अल्लू अर्जुन-रश्मिका मंदानाचे प्री रिलीज पार्टीतील फोटो व्हायरल...
- Kareena Kapoor Corona Positive: कोरोनाची लागण झाल्यानंतर करिनाची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाली...
- Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha