एक्स्प्लोर
नोटबंदीनंतर आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली: नोटबंदीनंतर देशात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. नोटंबदीनंतर देशभरात आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत 91 लाखांनी वाढ झाली आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 5.7 कोटी लोकांनी आयकर भरला होता. दरम्यान, 2017-18 या चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला 6.25 कोटी लोकांनी आयकर भरला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर 2017-18 आर्थिक वर्षाच्या शेवटी 7 कोटींपर्यंत हा आकडा पोहचेल असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नोटबंदीनंतर याच गोष्टीची सरकारकडून अपेक्षा करण्यात येत होती. आता जीएसटी लागू झाल्यानंतरही सरकार याच गोष्टी अपेक्षा करत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























