एक्स्प्लोर
Advertisement
आता फक्त 3 दिवसांत मिळवा पॅन कार्ड
नवी दिल्ली: आता आयकर विभागाने 3 दिवसांत पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्याची सुविधा सुरु केली आहे. उद्योजकांसाठी पॅन आणि टिन नंबर एका दिवसांतच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड बनवणाऱ्या विभागाशीच पॅन आणि टिन नंबर बनवणारा विभाग जोडण्यात आला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टरेट टॅक्स (सीबीडीटी) यासाठी पुढाकार घेतला असून, उद्योजकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
जेव्हा एनएसडीएल आणि यूटीआयएसएलच्या वेबसाईटवर पॅन नंबरसाठी तुम्ही अर्ज कराल, तेव्हा आधार नंबरवरून याचे व्हेरिफिकेशन होईल. सीबीडीटीच्या या पुढाकारामुळे टॅक्सपेअर्स डिजिटल सिग्नेचरचा यूज करण्याबरोबरच कोणत्याही एनेक्शचरकडेच आपला अर्ज जमा करावा लागेल. आणि ज्यांच्याकडे डिजिटल सिग्नेचर नाही, ते आधारच्या ई-सिग्नेचरच्या माध्यमातून तुम्ही अप्लाय करू शकता.
सध्या पॅन कार्ड तयार करण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. पण आता एनएसडीएल आणि यूटीआयएसएलच्या वेबसाईटवर पॅन नंबरसाठी तुम्ही अर्ज करताना तुमचा आधार नंबर व्हेरिफाय होईल. यामुळे वेळेचीही बचत होणार असून, पॅन नंबरही लवकरच उपलब्ध होईल. एका रिपोर्टनुसार, देशभरातील 11 लाख नागरिकांनी स्वत: चे एक पेक्षा जास्त पॅन कार्ड तयार केले आहेत. पण आता पॅन कार्डलाच आधार कार्डशी जोडण्यात आल्याने बोगस पॅन कार्ड बनवणाऱ्यांवर चाप बसेल.
सध्या पॅन कार्ड सर्वांसाठीच महत्त्वाचे कागदपत्र आहे. याच्या शिवाय तुम्ही आयकर रिटर्नच भरू शकत नाही. बँकेत खाते उघडण्यापासून ते पीएफ अशा सर्वप्रकारासाठी पॅन कार्ड अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही 3 दिवसांत कसे पॅन कार्ड बनवू शकता याबद्दल काही टिप्स देत आहोत.
1). सर्वात पहिला तुम्हाला पॅन कार्ड बनवण्यासाठी आयकर विभागाच्या पॅन कार्ड बनवणाऱ्या http://tin.nsdl/pan/ या लिंकवर क्लिक करा.
2). यावर क्लिक करताच पॅन कार्ड बनवणाऱे पेज ओपन होईल. त्यात हरवलेले पॅन कार्ड पुन्हा परत मिऴवण्याची माहिती अपलोड करून आपल्या सुविधेनुसार तम्ही ऑप्शन निवडू शकता.
3). नवे पॅन कार्ड मिळवण्यासाठी अर्ज करताना फॉर्म नंबर 49 ए भरावा लागतो.
4).फॉर्म सबमिट केल्यानंतर 15 नंबरचा एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. तो सांभाळून ठेवावा.
5). हा एक्नॉलेजमेंट नंबर तुम्हाला आयकर विभागाला पाठवावा लागतो. हा नंबर पाठवताना त्यासोबत तुमच्या ओळख पत्रची झेरॉक्स प्रत जोडावी लागते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement