एक्स्प्लोर
‘नीट’ 2017 ची परीक्षा आता मराठीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ 2017 ची परीक्षा आता इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही होणार आहे. इंग्रजीसह मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ आणि तेलुगू या प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना असेल.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी पुढच्या वर्षी ‘नीट’च्या परीक्षेला विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांचा पर्याय खुला असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत या निर्णयाबाबत माहिती दिली.
इंडियन मेडिकल काऊन्सिल अॅक्टमधील 1956 मधील 'सेक्शन 10 डी'नुसार, हिंदी, इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमध्ये ‘नीट’ची परीक्षा देता येईल. यासाठी केंद्राने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांशी चर्चाही केली आहे. राज्य सरकारांच्या आरक्षणाबाबतच्या धोरणाला कोणताही धक्का ‘नीट’संदर्भातील या नव्या निर्णयामुळे लागणार नाही, असेही केंद्राकडून स्पष्ट केले आहे.
‘नीट’ची परीक्षा प्रदेशिक भाषांमध्ये सुरु केल्यास पेपर फुटण्याची भाती व्यक्त केली जात होती. शिवाय, इंग्रजी वगळता इतर भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध नसल्याने हा पर्याय चूक असल्याचेही अनेकांचे म्हणणे होते. मात्र, अखेर केंद्राने ‘नीट’ची परीक्षा इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये देण्याची विद्यार्थ्यांना मुभा दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement