एक्स्प्लोर

Weather : उत्तर भारतात थंडी कायम, तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे

उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. तर महााराष्ट्रातही उन्हाचा चटका कायम आहे.

Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच जोरदार वारे वाहत असल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात देखील तापमानात चढ उतार कायम आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

राजस्थान

राजस्थानच्या अनेक भागात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळ वातावरण थंड झाले आहे. त्याचबरोबर सोसाट्याचा वाऱ्यामुळे थंडीही जाणवत आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, आता हवामान स्वच्छ होईल आणि सूर्यप्रकाश पडेल. आठवडाभर असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आजच्या तापमानाबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 28 अंश तर किमान तापमान 14 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला  आहे.

बिहार

आर्द्रता असलेल्या पश्चिमेकडील हवेमुळे राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, पुढील 24 तासांत ढगाळ वातावरण राहणार असून, बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 27 अंश, तर किमान तापमान 12 अंश राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पंजाब

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानंतर पंजाबमध्ये थंडी वाढली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण राहील. फक्त आज हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, 2 मार्चला म्हणजे उद्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 24 अंश तर किमान तापमान 10 अंश राहण्याचा अंदाज आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून, अधूनमधून पावसासोबत हिमवृष्टीही सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे आवर्तन 2 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आज श्रीनगरमध्ये कमाल तापमान 8 अंश आणि किमान तापमान उणे 2 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 22 आणि किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तराखंड

उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. अनेक भागात पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षीत आहे. राज्यातील बहुतांश भागात आज किमान तापमान 3 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हिमाचल प्रदेश

काल झालेल्या हिमवृष्टी आणि पावसामुळे हिमाचल प्रदेशात किमान तापमानात घट झाली आहे. आजही वातावरण थंड राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 11 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 0 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
Embed widget