(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Norovirus In Kerala : केरळमध्ये नोरोव्हायरसचे 2 रुग्ण आढळले; या विषाणूची नेमकी लक्षणं कोणती? जाणून घ्या
Norovirus In Kerala : देशात पसरलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा एकदा नोरोव्हायरसची (Norovirus) प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Norovirus In Kerala : देशात पसरलेल्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा एकदा नोरोव्हायरसची (Norovirus) प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. रिपोर्ट्सनुसार, जून महिन्यात केरळमधील विझिंजममध्ये दोन शाळकरी मुलांना नोरोव्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. विझिंजामी केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे आहे.
त्याचवेळी केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, दोन्ही बाधित मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे. सध्या नमुने घेऊन उर्वरित खबरदारी घेतली जात आहे.
जून 2022 में, केरल ने विझिंजम, तिरुवनंतपुरम में स्कूल जाने वाले बच्चों में नोरोवायरस के 2 मामले दर्ज़ किए। एसएसओ, केरल को एक विस्तृत रिपोर्ट प्रस्तुत करने के लिए कहा गया है, जिसे शीघ्र ही प्रस्तुत किया जाएगा: आधिकारिक सूत्र
— ANI_HindiNews (@AHindinews) June 6, 2022
नोरोव्हायरस म्हणजे काय?
रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, नोरोव्हायरस हा संसर्गजन्य संसर्ग आहे. यामुळे अतिसार, उलट्या, मळमळ आणि ओटीपोटात वेदना होतात. पब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटले आहे की, "संक्रमित लोकांच्या किंवा दूषित पृष्ठभागाच्या संपर्कातून ते सहजपणे पसरू शकते, परंतु संसर्ग झालेल्यांपैकी फक्त काही लोक दुसर्या व्यक्तीला आजारी बनवू शकतात. बहुतेक संक्रमण हे आजारी लोकांशी किंवा दूषित पृष्ठभागाच्या संपर्कामुळे किंवा दूषित अन्न किंवा पेयाच्या सेवनामुळे होतात. नोरोव्हायरस खूप संसर्गजन्य आहे आणि त्यामुळे उलट्या, जुलाब होतात, जरी हे सहसा काही दिवसांत निघून जाते. सीडीसीच्या मते, या संसर्गजन्य विषाणूची लागण झालेले लोक संसर्गाच्या साधारण तीन दिवसांत बरे होतात.
नोरोव्हायरसची लक्षणं
अतिसार, उलट्या, मळमळ, ओटीपोटात दुखणे, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये, विषाणूमुळे पोट किंवा आतड्यांमध्ये तीव्र जळजळ होऊ शकते.
अशी घ्या काळजी
विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी, स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. पाणी आणि साबण वापरून हात नियमितपणे धुवा. COVID-19 प्रमाणे, अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर्स नोरोव्हायरस मारत नाहीत, म्हणून साबण आणि पाणी हे सर्वोत्तम पर्याय आहेत.
महत्वाच्या बातम्या :