![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cancelled Trains : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आज 198 ट्रेन रद्द, अनेक गाड्याचे मार्ग बदलले
Cancelled Train List Today : आज भारतीय रेल्वेने 198 ट्रेन रद्द केल्या आहेत. त्याशिवाय अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. जाणून घ्या संपूर्ण यादी.
![Cancelled Trains : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आज 198 ट्रेन रद्द, अनेक गाड्याचे मार्ग बदलले indian railways update irctc cancelled trains 06 june 2022 see list here Cancelled Trains : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! आज 198 ट्रेन रद्द, अनेक गाड्याचे मार्ग बदलले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/01/7a1d5b94469800c91a7d7f7a57f5a753_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IRCTC Cancelled Trains Today List : रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आज भारतीय रेल्वेकडून 198 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करणाऱ्यांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं. रेल्वेनं 198 ट्रेन रद्द केल्या असून अनेक गाड्यांचं मार्ग बदलले आहेत. याशिवाय काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात (Reschedule) आल्या आहेत. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टमनुसार, रद्द झालेल्या गाड्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये, यासाठी रेल्वेकडून दररोज रद्द झालेल्या गाड्यांची यादी जारी केली जाते.
जाणून रद्द झालेल्या आणि मार्ग बदललेल्या गाड्यांची संपूर्ण यादी.
आज रद्द करण्यात आलेल्या गाड्या
भारतीय रेल्वेनं आज 6 जून रोजी 198 ट्रेन रद्द केल्या आहेत. याशिवाय 12 गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. शिवाय 10 गाड्या दुसऱ्या मार्गानं वळवण्यात आल्या आहेत.
प्रवासाआधी ट्रेनची सध्याची स्थिती तपासा
रद्द केलेल्या गाड्यांच्या यादीत पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्याआधी आपण प्रवास करणार असलेल्या ट्रेनची स्थिती तपासून नंतरच घराबाहेर पडा. तुम्ही ट्रेनची स्थिती ऑनलाइन सहज तपासू शकता.
गाड्या करण्याचं कारण काय?
अनेक वेगवेगळ्या झोनमध्ये सुरू असलेली दुरुस्ती आणि इतर कारणांमुळे या गाड्या रद्द करण्यात येतात. तर कधी खराब हवामान गाड्या रद्द करण्यात येतात. पाऊस, वादळ, वादळ यासारख्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द होतात. त्याचबरोबर अनेक वेळा कायदा आणि सुव्यवस्थेमुळे गाड्या रद्द केल्या जातात किंवा त्यांच्या वेळा बदलल्या जातात.
या ट्रेनही रद्द
- 12267 मुंबई सेंट्रल - हापा
- 12268 हापा - मुंबई सेंट्रल
- 22923 वांद्रे - जामनगर
रद्द झालेल्या गाड्यांची यादी कशी पाहावी :
- रद्द केलेल्या गाड्यांची यादी तपासण्यासाठी, तुम्ही प्रथम अधिकृत वेबसाइट https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जाऊन तपासू शकता.
- त्यानंतर Exceptional Trains या पर्यायावर क्लिक करा.
- आता येथे तुम्हाला रद्द, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांच्या यादीवर क्लिक करावे लागेल.
- यानंतर, तुम्हाला येथे एक संपूर्ण यादी दिसेल, यामध्ये तुम्ही तुमच्या ट्रेनचा नंबर तपासू शकता.
महत्त्वाच्या इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)