(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस नायपॉल यांचं निधन
प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस नायपॉल यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं आहे.
लंडन : प्रसिद्ध साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते लेखक व्ही. एस नायपॉल यांचं वयाच्या 85व्या वर्षी निधन झालं आहे. लंडनमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल अर्थात व्ही. एस नायपॉल यांनी 30 पेक्षा जास्त पुस्तकांचं लेखन केलं. 2001 मध्ये नायपॉल यांना साहित्यातील नोबेल पुरस्कारही मिळाला.
नायपॉल यांचा जन्म कॅरेबियन बेटावरच्या त्रिनिदाद या देशात झाला होता. नायपॉल यांचे वडील भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी इंग्लिश साहित्याची पदवी घेतली होती. त्यांच्या 'इन अ फ्री स्टेट' या कादंबरीला 1971 मध्ये बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होते.
Famed British novelist and Nobel Prize winner for Literature, Sir. V.S. Naipaul has breathed his last on Sunday. The author of "A House for Mr Biswas passed away at his home in London. He was 85. Read @ANI Story | https://t.co/wP1cc9j0k0 pic.twitter.com/W5EEsOdMHw
— ANI Digital (@ani_digital) August 11, 2018
नायपॉल यांनी आपल्या कारकिर्दितील लिखाणामुळे त्यांना 20व्या शतकातील महान लेखकांच्या रांगेत नेऊन ठेवले. नायपॉल यांनी लिहीलेल्या ‘अ बेन्ड इन दि रिव्हर’, ‘दि इनिग्मा ऑफ अराव्हल’, ‘फाईंडिंग दि सेंटर’ या कादंबऱ्यां खुप प्रसिद्ध झाल्या.